World Cup ट्रॉफीवर पाय, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मार्शविरुद्ध पोलीस तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mitchell marsh resting legs on world cup trophy man files complaint against aligarh uttar pradesh
mitchell marsh resting legs on world cup trophy man files complaint against aligarh uttar pradesh
social share
google news

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शच्या (mitchell marsh) हातात बिअर आणि विश्वचषकमध्ये मिळालेल्या ट्रॉफीवर (World Cup Trophy) त्याने पाय ठेवल्याचा त्याचा फोटो व्हायरल (Photo Viral) झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्याच्या या कृत्यामुळे एका आरटीआय कार्यकर्त्याने थेट पोलीस स्टेशन गाठून त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये मिचेल मार्शवर आरोप करण्यात आला आहे की, ट्रॉफीवर पाय  त्याने पाय ठेवल्याने आपला अपमान झाला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ता पंडित केशव देव यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मी स्वतः इंटरनेटवर एक फोटो बघितला होता. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल मार्शने विश्वचषकाच्या मिळालेल्या ट्रॉफीवर पाय ठेवला होता.

ADVERTISEMENT

दिल्ली गेट पोलिसात तक्रार

मिशेल मार्शविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यामध्ये म्हटले आहे यामुळे देशातील 140 कोटी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी मिशेल मार्शच्या विरोधात त्यांनी दिल्ली गेट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये मार्शविरोधात गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. यापुढे त्याच्यावर भारतात होण्यावर सामन्यामध्ये त्याच्यावर बंदी घालावी अशी मागणीही या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा >> मुंबईत पूर आला अन् प्रेग्नेंट बायको कारमध्ये…., माधवनने सांगितला काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग

ट्रॉफीचा अपमान

वर्ल्डकपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि त्यांच्या संघाचा ट्रॉफी देऊन गौरव केला होता. पण मिचेल मार्शकडून मात्र त्या ट्रॉफीचा अपमान करण्यात आला. त्याच्या त्या कृत्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मिशेलवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांकडेही तक्रार

ज्या पंडित केशव देव यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यांनी त्या तक्रारीची एक प्रत पंतप्रधान आणि क्रीडामंत्र्यांना दिली आहे. यावेळी भावेश शर्मा, ओमप्रकाश शर्मा, शिवकुमार, राम किशन, रवी सक्सेना उपस्थित होते. तुम्हाला सांगतो, ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा 6 विकेटने पराभव करून सहाव्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे.

हे ही वाचा >> 300 रूपयांसाठी नग्न केलं, नंतर धारदार शस्त्राने… ठाण्यात मुलासोबत नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT