Mumbai: मासिक पाळीच्या वेदनेने घेतला जीव; 14 वर्षीय मुलीच्या कृतीने सगळेच हादरले

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai News : स्त्रियांमधलं खरं बाईपण हे मासिक पाळी आल्यानंतरच सुरू होतं असं म्हटलं जातं. पण जन्मानंतरच तिच्यात वेगवेगळ्या रूपाने बाईपण आलेलं असतं. मासिक पाळी, मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांचा सांभाळ करण्यापर्यंत सोसाव्या लागणाऱ्या कळा, वेदना, होणारे हाल एक बाईच सहन करू शकते असं अनेकदा म्हणतात. हे बाईपण जितकं भारी वाटतं तितकंच ते तिच्यावर भारीही असतं. (Mumbai Malad news a 14-year-old girl committed Suicide cause of Menstrual pain )

आजकाल मासिक पाळीबद्दल पालक आपल्या मुलींशी मोकळेपणाने बोलतात. पण काही पालक मुलींशी याविषयी बोलण्यात कचरतात त्यामुळे बहुतेक मुलींना याबाबत माहिती नसते. मुंबईत असाच काहीसा प्रकार घडला आहे ज्यामुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने माहितीच्या अभावी आणि वेदना असह्य्य झाल्याने डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं आहे. 

14 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं?

मुंबईत, एका 14 वर्षांच्या मुलीने तिच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी तीव्र वेदना झाल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (26 मार्च) रात्री उशिरा मुंबईतील मालाड परिसरातील मालवणी येथे घडली. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी मासिक पाळीच्या दुखण्यामुळे खूप तणावाखाली होती आणि ती डिप्रेशन सारख्या स्थितीत गेली होती. घरी कोणी नसताना मुलीने हे टोकाचं पाऊल उचललं. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोमवारी (25 मार्च) या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली. यानंतर तिला प्रचंड वेदना आणि डिस्चार्जचा सामना करावा लागला. तिला मासिक पाळीबद्दल काहीच माहिती नव्हती. वेदना जाणवल्यानंतर मुलीने कुटुंबीयांना सांगितलं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती खूप अस्वस्थ आणि अत्यंत तणावाखाली होती आणि तिने मंगळवारी रात्री आत्महत्या केली.

यानंतर कुटुंबीयांनी मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस अधिकारी आता कुटुंबातील सर्व सदस्य, परिसरातील मुलीचे मित्र-मैत्रीण आणि शाळेतील लोक यांचे जबाब घेणार आहेत. 

ADVERTISEMENT

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कोणत्याही प्रकारची गडबड आढळून आलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलींसाठी मासिक पाळीबद्दलचे शिक्षण खूप महत्वाचे आहे. मोठ्या शहरांमध्येही अनेक मुलींना याची माहिती नसते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यही याला हलकेच घेतात आणि याला रोजचीच गोष्ट म्हणतात. अशा वेळी योग्य मार्गदर्शन आणि जागृकतेची गरज असते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT