जुगार खेळून धंद्यालाच लागला, मॅनेजरने चक्क SBI बँक लुटली!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mumbai Crime News : मुंबईत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) मॅनेजरने आपल्या जुगाराच्या व्यसनामुळे ग्राहकांचे तीन कोटी रुपयांचे सोने गायब केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकरमधून ग्राहकांचे सोने गायब करणाऱ्या SBI मॅनेजरला पोलिसांनी अटक केली आहे. माहितीनुसार, चोरी केलेले सोने अद्याप परत मिळालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मॅनेजरने बँकेतील ग्राहकांचे जवळपास तीन कोटी रूपये किंमतीचे चार किलो सोने चोरले. भांडूप पोलिसांनी सांगितले की, मनोज मारुती म्हस्के (33) असे आरोपी बॅंक मॅनेजरचे नाव आहे. आरोपी मॅनेजर हा मुलुंड पश्चिम येथील एसबीआयच्या खासगी बँकिंग शाखेत सर्व्हिस मॅनेजर म्हणून कार्यरत होता. याशिवाय आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, ज्याने मनोजला सोने विकण्यात मदत केली होती. फरीद शेख असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.

SBI बँकेतून सोन्याची 63 पैकी 59 पाकिटे गायब!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शाखा प्रशासक अमित कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी पोलिसांना सांगितले की, 27 फेब्रुवारीला लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या 63 पाकिटांपैकी 59 पाकिटे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवशी मनोज म्हस्के रजेवर होता. अमितने फोनवर मनोजला विचारलं असता, त्याने सोनं घेतलं असून नंतर तो परत करेल असं सांगितलं. यानंतर अमितने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांत तक्रार दाखल केली.

हे वाचलं का?

अद्याप सोने परत मिळालेले नाही

एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मनोज म्हस्के याला ऑनलाइन जुगार खेळण्याचे व्यसन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या व्यसनामुळे त्याने बँकेतून सोने चोरले. मात्र, आतापर्यंतच्या तपासात सर्व प्रयत्न करूनही पोलिसांना सोने जप्त करण्यात यश आलेलं नाही आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT