Crime : नागपूर हादरलं! इंजिनियर तरूणीवर तब्बल 5 वर्षे बलात्कार, पैसे देखील उकळले
पीडीत तरूणीची ओळख जीम ट्रेनर रोहित पांडेसोबत झाली होती. रोहित पांडेची तरूणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान तिला काहीच कळू न देता तिचे अश्लील फोटो देखील त्याने काढले होते.
ADVERTISEMENT
Nagpur Crime News : नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत एका 26 वर्षीय इंजिनीअर तरूणीवर तब्बल पाच वर्ष बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने पीडितेच्या ओळखीचा फायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार (Rape Case) केल्याची घटना घडली आहे. ही घटना उजेडात येताच संपूर्ण नागपूर हादरले आहे. या प्रकरणी आरोपी जीम ट्रेनरला (Gym Trainer) पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. (nagpur crime news 26 year old engineer girl rape for 5 year and extored shocking crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत 26 वर्षीय तरूणी ही इंजिनियर असून ती नागपूरमध्ये एकटीच राहायची. पीडित तरूणीला व्यायामाची आवड असल्याने नजिकच्या जीममध्ये तिने ट्रेनिंग सुरू केली होती. या दरम्यान तिची ओळख जीम ट्रेनर रोहित पांडेसोबत झाली होती. रोहित पांडेची तरूणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यावर बलात्कार केला. या दरम्यान तिला काहीच कळू न देता तिचे अश्लील फोटो देखील त्याने काढले होते.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal नी शिंदे सरकारविरोधात थोपटले दंड! ओबीसींना हाक, केली मोठी घोषणा
पुढे जाऊन त्याने तिचे हेच अश्लील फोटो कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने या फोटोंच्या माध्यमातून पीडित तरूणीकडून पैसे देखील उकळले. आरोपीने तब्बल 6.5 लाख रूपये तरूणीकडून उकळते होते. साधारण 2019 पासून ते 16 मार्च 2023 दरम्यान आरोपीने पीडितेवर बलात्कार करून तिच्याकडून पैसे उकळले होते.
हे वाचलं का?
अखेर आरोपीच्या या जाचाला कंटाळून पीडीतेने पारडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर रोहित पांडेविरोधात बलात्कार आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी जीम ट्रेनर रोहित पांडेला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
हे ही वाचा : Nitish Kumar : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर नितीश कुमार PM मोदींना काय म्हणाले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT