Crime News: नंदुरबारमध्ये 'बदलापूर' कांड! 'इंटरनेट सुरू करून दे' म्हणत सफाई कर्मचाऱ्याने...
नंदुरबार : Nandurbar Crime News : कोलकाता, बदलापूर प्रकरणानंतर देशभरातून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यादरम्यान आता नंदुरबारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नंदुरबार : Nandurbar Crime News : देशात सध्या मुलींच्या सुरक्षेविषयीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोलकाता, बदलापूर प्रकरणानंतर देशभरातून अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यादरम्यान आता नंदुरबारमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. नंदुरबार शहरातील एका शाळेत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थीनीचा सफाई कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. (nandurbar crime news 5th class girl molested in school by cleaner)
ADVERTISEMENT
मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी शाळेतील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून माणुसकीला काळीमा फासणारं भयानक कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या आईच्या तक्रारीवरून संबंधित कर्मचारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका अशा तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : Gold Price Today: बापरे! सणासुदीला सोन्याच्या किंमतीत भडका; आज 1 तोळ्याची किंमत किती?
हे वाचलं का?
'इंटरनेट सुरू करून दे' म्हणाला अन्...
पीडित मुलीच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, शहरातील नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीस कंत्राटी सफाई कर्मचारी असणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने मोबाइलमध्ये इंटरनेट सुरू करून दे असं सांगितलं. यावेळी त्यातील अश्लील व्हिडीओ दाखवत त्याने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather: महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार! वाचा IMD चा आजचा अंदाज
ADVERTISEMENT
पीडिती मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार रात्री आईला सांगितला. यानंतर आईने सकाळी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आता कर्मचाऱ्याला कामावरून काढण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच्यावर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच, संस्थेचे चेअरमन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT