Gold Price Today: बापरे! सणासुदीला सोन्याच्या किंमतीत भडका; आज 1 तोळ्याची किंमत किती?
Gold-Silver Price Today : सणासुदीला सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक वाढली आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशावेळी आज (29 ऑगस्ट) सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे.
ADVERTISEMENT
Gold-Silver Price Today : सणासुदीला सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक वाढली आहे. सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. अशावेळी आज (29 ऑगस्ट) सोन्याने पुन्हा एकदा उच्चांक गाठला आहे. अशावेळी आजचे भाव कितीने वाढले जाणून घेऊया. (gold-silver prices hike today 29 august 2024 in maharashtra mumbai pune know the details)
ADVERTISEMENT
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आज गुरूवारी सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे.
हेही वाचा :
हे वाचलं का?
Goodreturns वेबसाईटनुसार, बुधवारी (28 ऑगस्ट 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 73, 250 रूपये होता. पण आज यामध्ये 10 रूपयांनी वाढ झाली असून तो 73, 260 रूपयांवर पोहोचला आहे. तर, 22 कॅरेट सोन्याच्या भावातही 10 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. एक किलो चांदीची किंमत 10 रूपयांनी कमी झाली असून 88,400 रूपये इतकी आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
ADVERTISEMENT
मुंबई
ADVERTISEMENT
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,260 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रूपये आहे.
पुणे
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,260 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रूपये आहे.
नागपूर
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,160 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,260 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,950 रूपये आहे.
नाशिक
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,190 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,290 रूपये आहे.
10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54,980 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा :
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT