बहिणीला केली शिवीगाळ, चुलत भावांना हाताशी धरत तरुणाला जीवे मारले
Pune crime news : पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर एका तरुणीला शिवीगाळ केली. शिवीगाळ करणाऱ्या तरुणीच्या बहिणीने आपल्या साथीदारांना सोबत घेत युवकाला अमानुषपणे मारहाण केली आहे. ही घटना आहिल्यानगरमध्ये घडली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर एका तरुणीला शिवीगाळ केली.

शिवीगाळ करणाऱ्या तरुणीच्या बहिणीने आपल्या साथीदारांना सोबत घेत युवकाला अमानुषपणे मारहाण केली आहे.
Pune crime news : पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या एका तरुणाने इन्स्टाग्रामवर एका तरुणीला शिवीगाळ केली. शिवीगाळ करणाऱ्या तरुणीच्या बहिणीने आपल्या साथीदारांना सोबत घेत युवकाला अमानुषपणे मारहाण केली आहे. ही घटना 10 मे दिवशी आहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात घडली आहे. या घटनेने आहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : पुणे शहरात18 वर्षीय तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार, नेमकं कारण काय?
मृत झालेल्या तरुणाचे नाव हे साईनाथ काकडे आहे. या कृत्या विरोधात साईनाथचा भाऊ महेश गोरक्षनाथ काकडे याने कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साईनाथने केलेल्या तक्रारीनुसार, मृत भाऊ साईनाथ आणि तरुणी रुपाली लोंढे हे एकमेकांच्या परिचयाचे होते. रुपालीही सध्या पुण्यातच वास्तव्यास आहे.
नेमकं काय होतं प्रकरण?
साईनाथ आणि रुपाली लोंढेची बहीण हे दोघेजण एकमेकांच्या ओळखीचे होते. साईनाथने रुपाली लोंढेच्या बहिणीला सोशल मीडियावर शिवीगाळ केली होती. हा राग मनात ठेवत रुपालीने आपल्या भावांना हातीशी घेतलं. ज्यात अनिल लोंढे, दिनेश आसने, पवन आसने, राहुल चांदर यांनी साईनाथला घरातून बाहेर फरफटत आणले. त्याला एका निर्जणस्थळी नेले, त्यानंतर त्याला मारहाण करत औषध पाजण्यात आले.
त्यानंतर साईनाथला एका शिर्डितल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी साईनाथला मृत घोषित केलं. या घडलेल्या घटनेनंतर पाचही आरोपींविरुधात कोपरगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पाच जणांचा बुडून मृत्यू, आत्महत्या की अपघात?
शिवीगाळ करणारा तरुण आणि ज्या व्यक्तीला शिवीगाळ करण्यात आली ती तरुणी एकमेकांच्या ओळखीचे होते. त्यामुळे त्यांच्यातील वादाचे कारण समोर आले नाही. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.