Crime: वासनांध काकाचा भाचीच्या अब्रूवर डोळा; रेप करता आला नाही म्हणून… पोलिसांचा धक्कादायक खुलासा!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

UP Jhansi Crime News Minor Murder Case Revealed uncle brutally killed her
UP Jhansi Crime News Minor Murder Case Revealed uncle brutally killed her
social share
google news

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झाशी (Jhansi) येथे नवीन वर्षाच्या मुहूर्तावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोचीखेडा आदिवासी वस्ती बबिना येथे घडलेल्या क्रूर प्रकरणाचा खुलासा झाला आहे. शुक्रवारी (29 डिसेंबर) 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. मृतदेह पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही अचंबित झाले. घरापासून काही अंतरावर एका खड्ड्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह पडलेला होता. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. (UP Jhansi Crime News Minor Murder Case Revealed uncle brutally killed her)

ADVERTISEMENT

17 वर्षीय मुलीसोबत त्या रात्री काय घडलं?

या खुनाचा उलगडा करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, मृत्यू झालेली मुलगी अतिशय चंचल स्वभावाची होती. मुलीने चांगले कपडे घातले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता, तिच्या नात्यातला काका या मुलीशी बोलायचा असे माहितीदारांकडून समोर आले. तो अनेकदा मुलीची छेडही काढायचा.

वाचा : Crime: रक्ताच्या चिळकांड्या अन् दगडाने ठेचलेला मृतदेह; शौचालयात अल्पवयीन मुलीसोबत काय घडलं?

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह

पोलिसांनी संशयाच्या आधारे मुलीच्या काकाला ताब्यात घेतले. यावेळी ताब्यात घेऊन कडक चौकशी केली असता, आरोपीने पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला. त्याच्या तोंडून घटनेची कहाणी ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

हे वाचलं का?

वाचा : New Hit And Run Law: ट्रक चालकांनी पोलिसांना पळवून-पळवून मारलं, नवी मुंबईत हायवेवर तुफान राडा

पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा

एसपी सिटी ज्ञानेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, आरोपी काकाला पॉर्न फिल्म पाहण्याचे व्यसन होते. 28 डिसेंबर रोजी सायंकाळी अल्पवयीन मुलगी शौचालयात निघालेली असताना वाटेत तिला मागून काकने पकडले. आरोपी अनिलने (काका) भाचीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अनिलच्या या कृतीचा मुलीने विरोध केला असता, क्रूर काकाने तिचा गळा दाबून हत्या केली. भाचीची हत्या केल्यानंतर मृतदेह खड्ड्यात फेकून दिला.

ADVERTISEMENT

वाचा : सीमा हैदरने दिली गुड न्यूज, सचिनच्या बाळाची आई होणार

भाचीच्या मृतदेहाजवळ बसून काकाचा टाहो

आरोपीने तरुणीच्या डोक्यात दगड फेकून घटनास्थळावरून पळ काढला. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व प्रकरणानंतर कुटुंबासोबत मारेकरी काकाही आपल्या भाचीच्या मृतदेहाजवळ बसून रडत होता. एवढंच नाही तर खुनी काका अनिल स्वतः पोलिसांना खुन्याच्या शोधात मदत करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत फिरत होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT