Maharashtra Lok Sabha Election : 1.8 कोटी मतदारांची पाठ, निकाल फिरणार?
Lok Sabha Election 2024 Latest news : पहिल्या टप्प्यात मतदान न केलेल्या मतदारांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्याचा परिणाम अनेक मतदारसंघात होताना दिसेल, असे राजकीय विश्लेषक म्हणतात.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणूक २०२४ मतदानाची टक्केवारी
लोकसभा निवडणूक २०२४ पहिला टप्पा
Lok Sabha Elections 2024 Maharashtra : लोकसभेच्या निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जूनला पार पडेल आणि ४ जूनला भारतात नेमकं कुणाचं सरकार येणार, हे स्पष्ट होईल. अनेक भागांमध्ये मतदान कमी झाल्याचं समोर आलं. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत, यावेळी पहिल्या टप्प्यात देशभरात तब्बल १. ८ कोटी लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे घटती मतदानाची आकडेवारी लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे. (1.8 crore voters did not vote in the first phase of the Lok Sabha elections 2024)
ADVERTISEMENT
१९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात देशभरातील २१ राज्य आणि १०२ मतदारसंघांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तब्बल १.८६ कोटी मतदार घटल्याचे दिसून येत आहे.
मतदारांनी फिरवली पाठ
२०१९ च्या निवडणुकीत ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१९ च्या पहिल्या फेजमध्ये ९ कोटी १३ लाख ७९ हजार ४०९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.
हे वाचलं का?
हेही वाचा >> शिंदे 'ही' जागा जिंकणार; सट्टा बाजाराने ठाकरेंची वाढवली चिंता
२०१९ मध्ये पहिल्या टप्पात ९१ मतदारसंघांमध्ये निवडणूक घेण्यात आली होती. तर २०२४ मध्ये १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात ११ कोटी ५२ हजार १०३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. २०२४ च्या निवडणुकीत आधी म्हटल्याप्रमाणे यंदा १०२ मतदारसंघांमध्ये निडणूक घेण्यात आली. २०१९ आणि २०२४ या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानाची तुलना केल्यास २०२४ मध्ये १.८६ कोटी मतांची घट दिसून येत आहे.
कोणत्या मतदारांची संख्या किती?
२०१९ च्या पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये ४ कोटी ६४ लाख ३० हजार ६१४ इतक्या पुरुष मतदारांचा समावेश होता. तर ४ कोटी ४९ लाख २० हजार ५७१ इतक्या महिला मतदार होत्या. या निवडणुकीत १ हजार ३९५ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केलं होतं.
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाने फेब्रुवारीत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये ८९.६ कोटी पात्र मतदार होते, तर २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९६.८ कोटी इतकी झाली.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> BJP जिंकणार की नाही, सट्टा बाजाराने कोणाचं वाढवलं टेन्शन?
आपण मतांच्या टक्केवारीमध्ये विचार केला तर २०२४ मध्ये पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के इतकं मतदान झालं, तर दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. याची तुलना २०१९ शी केली तर २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात ६९.४३ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६७.८४ टक्के मतदान झाल्याचं समोर आलं.
निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्ष आणि काही संस्थांनी शंका उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीतील पाचही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे.
प्रत्येक मतदार केंद्रावर झालेल्या मतदानाची आकडेवारी ४८ तासांमध्ये प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल कऱण्यात आली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
हेही वाचा >> MVA महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज
निवडणुकीची प्रक्रिया सुरु असल्याने न्यायालय हस्तक्षेप करुन आयोगाला कुठलेही आदेश देणार नाही असं देखील न्यायालयाने स्पष्ट केलंय. परंतु न्यायालयाच्या सुनावणीनंतर दुसऱ्याच दिवशी निवडणूक आयोगाकडून आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात किती मतदान?
आता २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी निरुत्साह दिसून आला. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ६३.७१ टक्के मतदान पार पडलं.
हेही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, अजित पवारांनी उतरवला उमेदवार
या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदीया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर मतदारसंघाचा समावेश होता. यात सर्वात कमी मतदान नागपूर मध्ये पार पडलं होतं नागपूरमध्ये २०२४ मध्ये ५४.३२ टक्के इतकं मतदान पार पडलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT