Lok Sabha Election 2024 : MVA महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? सट्टा बाजाराचा मोठा अंदाज
Satta Bazar on Lok Sabha Election 2024 : सट्टा बाजाराने (Satta Bazar) महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) निकालाबाबात धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत. इतकचं नाही तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत जागांवर कोणता उमेदवार जिंकणार आहेत, याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे नेमका सट्टाबाजाराचा अंदाज काय आहे? तो जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT
Satta Bazar on Lok Sabha Election 2024 : राज्यातील 48 लोकसभेच्या जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणुकीनंतर आता 4 जूनला येणाऱ्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिक्षा लागली आहे. तत्पुर्वी सट्टा बाजाराने (Satta Bazar) महाराष्ट्रातील (Maharashtra Lok Sabha) निकालाबाबात धक्कादायक अंदाज वर्तवले आहेत. इतकचं नाही तर महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत जागांवर कोणता उमेदवार जिंकणार आहेत, याची देखील माहिती दिली आहे. त्यामुळे नेमका सट्टाबाजाराचा अंदाज काय आहे? तो जाणून घेऊयात. (satta bazar prediction on maharashtra lok sabha election 2024 how many seat maha vikas aghadi and mahayuti win rahul gandhi pm narendra modi)
ADVERTISEMENT
देशात भाजपने 400 पारचा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रात भाजपने 45 पारची घोषणा केली होती. पण सट्टाबाजाराने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीए आघाडीला 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजप लोकसभा निवडणूक सहज जिंकेल, पण त्यांना 400 पारचा टप्पा गाठता येणार नाही, असा अंदाज सट्टाबाजाराने व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Ravindra Dhangekar : धंगेकर रस्त्यावर, पण टार्गेट कोण? समजून घ्या अर्थ
भाजप देशात किती जागा जिंकणार?
पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी म्हणजे सुरुवातीला भाजपसाठी मतांची संख्या जास्त होती. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुंबईतील टॉप बुकींच्या अंदाजानुसार, मतदानापूर्वी सुरुवातीला सट्टेबाजीने भाजपला 315 ते 325 तर काँग्रेसला 45 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाली आहे. त्यावेळी भाजपला 270 ते 280 जागा मिळण्याचा अंदाज होता. तर काँग्रेस 70 ते 80 जागांच्या दिशेने चांगली वाढ दर्शवत होती. मात्र आता पुन्हा 6 टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती बदलली आहे. सट्टेबाजारातील बुकींनी आता भाजप 295 ते 305 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टा बाजाराने कधीही 400 पार घोषणेचे समर्थन केले नाही. सट्टेबाजीच्या बाजारभावानुसार 350 जागा देखील शक्य नाहीत."
राज्यात कोणाली किती जागा मिळणार?
महाराष्ट्र : एनडीए आघाडीला 28 जागा
उत्तर प्रदेश : एनडीएला आघाडीला 64 ते 66 जागा
गुजरात : तिसऱ्यांदा क्लीन स्वीप होईल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pune Accident प्रकरणात तीन जणांना अटक, आमदार सुनील टिंगरे गायब?
'या' जागांवर कोण जिंकणार?
नागपूर : नागपूरमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज आहे. नितीन गडकरी या जागेवरून लोकसभा लढवत आहेत.
ADVERTISEMENT
चंद्रपुर : चंद्रपुरमध्ये काँग्रेस जिंकण्याचा अंदाज आहे. प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यवतमाळ : यवतमाळची जागा ठाकरेंच्या पारड्यात येण्याचा अंदाज आहे. संजय देशमुख या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.
अमरावती : अमरावतीची जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज आहे. बळवंत वानखेडेने या जागेवरून लोकसभा लढवली होती.
बारामती : बारामतीचा गड शरद पवार राखणार, सुप्रिया सुळे या जागेवरून जिंकण्याचा अंदाज आहे.
मुंबई उत्तर मतदारसंघ : ही जागा भाजप 3 लाखांहून अधिक मतांनी विजयी होण्याचा अंदाज आहे. पीयूष गोयल निवडणूक लढवत आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूरची जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज आहे. शाहू छत्रपती महाराज ही निवडणूक लढवत आहेत.
नाशिक : ही जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना जिंकण्याचा अंदाज, हेमंत गोडसेंनी निवडणूक लढवत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT