Ravindra Dhangekar : धंगेकर रस्त्यावर, पण टार्गेट कोण? समजून घ्या अर्थ
Ravindra Dhangekar politics Explained : पुणे अपघात प्रकरणानंतर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर इतके आक्रमक का झाले आहेत, त्यांना त्यातून काय साध्य करायचं आहे?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आमदार रवींद्र धंगेकर इतके आक्रमक का?

पुणे अपघात प्रकरणानंतर धंगेकर रस्त्यावर का आले?

धंगेकरांच्या आंदोलनाचा समजून घ्या अर्थ
Ravindra Dhangekar Politics : पुण्यातील पोर्शे कार प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताहेत. या खुलाश्यांमुळे शासकीय यंत्रणा कशी बरबटली आहे हे पाहायला मिळतंय. पोर्शे कार अपघात प्रकरण माध्यमांनी उचलून धरल्यानंतर आता पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. माध्यमांनी जेवढं हे प्रकरण लावून धरलं तितकच हे प्रकरण आणखी एका व्यक्तीने लावून धरलं त्याचं नाव आहे रवींद्र धंगेकर. हे प्रकरण समोर आल्यानंतर थेट पुणे पोलीस आयुक्तांची बदली करण्याची मागणी धंगेकरांनी केली. (Why has Congress kasba peth MLA Ravindra Dhangekar become so aggressive?)
या प्रकरणात जसे रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्याच पद्धतीने रवींद्र धंगेकर देखील रोज नवा मुद्दा घेऊन रस्त्यावर येत आहेत आणि आंदोलन करताहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर अग्रवाल प्रकरणात इतके आक्रमक का झालेत? नेमका त्यांचा अजेंडा काय आहे, हेच समजावून घेऊयात...
पोर्शे कार अपघात आणि रवींद्र धंगेकर
पुणे अपघात प्रकरण तापताच रवींद्र धंगेकर देखील आक्रमक झाले. पोलिसांनी एफआयरमध्ये ३०४ कलम न लावल्यामुळे अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्याचा आरोप धंगेकरांनी केला.
हेही वाचा >> "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन
कार्यकर्त्यांना घेऊन ते थेट येरवडा पोलीस स्टेशनमध्ये धडकले. तिथे त्यांनी आंदोलन केलं आणि कारवाईची मागणी केली. या प्रकरणात करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील यावेळी धंगेकरांनी केला. धंगेकरांनी थेट पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केली.