जळगाव : मुलाच्या अपहरणाच्या अफवेने घेतला बळी, तरुणाची जमावाने केली हत्या; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Jalgaon Crime News : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

ADVERTISEMENT

Jalgaon Crime News
Jalgaon Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जळगाव : मुलाच्या अपहरणाच्या अपवेने घेतला बळी

point

तरुणाची जमावाने केली हत्या

point

नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime News : जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीत एका 30 ते 35 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव तालुक्यातील अव्हाणे शिवारात घडली आहे. मुलाला पळवून नेण्याच्या संशयावरून हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव ते कानळदा रोडवरील अव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंग परिसरात सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी रात्री 7 ते 8 वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण संशयास्पदरीत्या वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर भगवान सोनवणे यांचा 3 वर्षांचा मुलगा विराट उर्फ लकी याला उचलून घेऊन जात असल्याचा संशय उपस्थितांना आला. या संशयाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि बघता बघता मोठा जमाव गोळा झाला.

हे ही वाचा : प्रियकरासमोर तरुणीवर 7 जणांकडून आळीपाळीने सामूहिक बलात्कार! बळजबरीने पैशांची मागणी अन्...

अमानुष मारहाण आणि पोलिसांची धाव

जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना कळवण्याऐवजी सदर तरुणाला पकडून लाथा-बुक्क्यांनी आणि मिळेल त्या वस्तूने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव तालुका पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या नाका-तोंडातून रक्त येत होते आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp