Maharashtra Weather : राज्यात कुठे ऊन तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता, IMD विभागाचा अलर्ट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यात मिश्र हवामानाची स्थिती जाणवणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह गडगडाटाची शक्यता आहे. या विभागांसाठी IMD विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 जानेवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात मिश्र हवामानाची स्थिती

point

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या

Maharashtra Weather : राज्यात मिश्र हवामानाची स्थिती जाणवणार आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची अपेक्षा आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांसह गडगडाटाची शक्यता आहे. या विभागांसाठी IMD विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 24 जानेवारी रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज. 

हे ही वाचा : रश्मिका- विजय देवरकोंडा बोहल्यावर चढणार, विवाह सोहळ्याला दिलं 'ते' स्पेशल नाव

राज्यातील हवामान विभागाचा अंदाज

IMD विभागानुसार, पुढील 24 तासांत हवामानात फारसा बदल होणार नाही अशी शक्यता वर्तवली आहे. किमान तापमानातही फारसा बदल अपेक्षित नाही, परंतु राज्याच्या काही भागांत उष्णतेची सुरुवात होण्याचे संकेत आहेत.

कोकण विभागात मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यामध्ये कोरडं हवामान राहील. तसेच हवामानात फार मोठा फरक जाणवणार नाही. 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पुढील दोन दिवस चिंतेचे असण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसेच बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp