कराडमध्ये बांगलादेशींची घुसखोरी, मुंबईत खोटे कागदपत्र बनवून राहत होते, चौघांना ठोकल्या बेड्या

मुंबई तक

Satara News : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती उघडकीस आली आहे.मुलकी अधिकाऱ्यांनी घुसखोऱ्यांची कोणतीही माहिती न घेता भारत-बांगलादेश सीमेवरून कराडच्या मुंढे गावात प्रवेश केला. त्याच ठिकाणी ते गेली सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होते. या प्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली.

ADVERTISEMENT

Satara News
Satara News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कराडमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची नावे

point

चौकशीतून आलं समोर 

Satara News : सकलेन मुलाणी - सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बांगलादेशींनी घुसखोरी केल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुलकी अधिकाऱ्यांनी घुसखोऱ्यांची कोणतीही माहिती न घेता भारत-बांगलादेश सीमेवरून कराडच्या मुंढे गावात प्रवेश केला. त्याच ठिकाणी ते गेली सहा महिन्यांपासून वास्तव्य करत होते. या प्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. या बांगलादेशी घुसखोरांना आश्रयासाठी मदत करणाऱ्या करण बापू कांबळे यालाही अटक केली. संबंधित प्रकरणात काही संशयितांना न्यायालयात हजर केले. 

हे ही वाचा : धाराशिव : चार दिवसांपूर्वी साखरपुडा, मेहंदीचा रंग उतरण्याआधीच नवरदेव अन् नवरी मुलीवर काळाचा घाला

कराडमध्ये घुसखोरी केलेल्या बांगलादेशींची नावे

बांगलादेशी घुसखोरांची नावे आता समोर आलेली आहेत. बिलाल सलाल उद्दीन मुल्ला, आयेशा अदिल शेख आणि नसरिन अब्दुलसालाय मुल्ला अशी त्यांची नावे आहेत. देशात सध्या बांगलादेशी घुसखोरांमुळे गदारोळ सुरु असताना कराडमध्ये कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी एका पत्रकाराच्या माहितीच्या आधारे माहिती मिळवली की, एका इमारतीत बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. 

चौकशीतून आलं समोर 

याचवरून आता कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखील मगदूम यांनी तात्काळपणे कारवाईच्या सूचना दिल्या. ज्या इमारतीत बांगलादेशींना लपवण्यात आलं त्या इमारतीचं नाव ‘सह्याद्री रेसिडेन्सी’ असे आहे. याच इमारतीजवळ जाऊन चौकशी करण्यात आली होती. याचदरम्यान बिलाल मुल्लाकडे विचारपूस केली असता, आणखी दोघेजण इथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच याच लोकांनी मुंबईत बनावट पत्त्यांवर आधारकार्ड बनवून घेतल्याची कबुली देखील दिली. 

हे ही वाचा : मामीसह तिच्या मुलीला भाच्याने गळा दाबून संपवलं, मृतदेह बेडमध्ये भरून ठेवला

घुसखोरांची बेकायदेशीर कागदपत्रे  

या प्रकरणी बिलाल सलाल उद्दीन मुल्ला, आयेशा अदिल शेख आणि नसरिन अब्दुलसालाय मुल्ला या तिघांना ताब्यात घेण्यात आले. हे तिघेही बांगलादेशातून भारतात आले असून कराडमध्ये वास्तव्यास आहेत. बांगलादेशींना लपवण्यासाठी मदत करणारी व्यक्ती करण बापू कांबळे यालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्याकडे आढळून आलेली कागदपत्रे बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp