Govt Job: 'हिंदुस्तान पेट्रोलियम'मध्ये मध्ये 608 पदांसाठी मोठी भरती... इंजीनिअर तरुणांसाठी उत्तम संधी

मुंबई तक

हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील प्रसिद्ध तेल आणि वायू कंपनीकडून 608 पदवीधर अप्रेन्टिस ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

HPCL मध्ये 608 पदांसाठी मोठी भरती...
HPCL मध्ये 608 पदांसाठी मोठी भरती...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'हिंदुस्तान पेट्रोलियम'मध्ये मध्ये 608 पदांसाठी मोठी भरती...

point

इंजीनिअर तरुणांसाठी उत्तम संधी

Govt Job: इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या देशातील प्रसिद्ध तेल आणि वायू कंपनीकडून 608 पदवीधर अप्रेन्टिस ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आजच्या जगात, इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर योग्य व्यासपीठ शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. HPCL सारख्या प्रतिष्ठित कंपनीत अप्रेंटिसशिप पदावरील उमेदवारांना केवळ औद्योगिक अनुभवच नव्हे तर व्यावहारिक काम करण्याची संधी सुद्धा प्राप्त होईल.  या भरतीसाठी उमेदवार 2 मार्च 2026 पर्यंत अर्ज करू शकतात. 

काय आहे पात्रता? 

या भरतीमधील ग्रॅज्युएट अप्रेन्टिस ट्रेनी पदासाठी उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.ई (B.E)किंवा बी.टेक (B.Tech)ची पदवी असणं आवश्यक आहे. ही डिग्री सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इंस्ट्रूमेंटेशन ब्रांचमध्ये असणं गरजेचं आहे. यासाठी सामान्य (General) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना किमान 60 टक्के गुण असणं अनिवार्य आहे तसेच, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमती (ST) आणि अपंग उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह पदवीचं शिक्षण पूर्ण करणं अनिवार्य आहे. यासोबतच, उमेदवाराचं उत्तीर्ण वर्ष 1 एप्रिल 2023 किंवा त्यानंतरचं असणं आवश्यक आहे. यापूर्वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार नाहीत. 

वयोमर्यादा 

हिंदुस्तान पेट्रोलियमच्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट दिली जाईल. म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 5 वर्षे, ओबीसी प्रवर्गासाठी 3 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 10 वर्षे सूट दिली जाईल.  

हे ही वाचा: मुंबईची खबर: आता, मुंबईत पुन्हा मोनोरल धावणार! MMRDA चा मोठा निर्णय... कधीपासून होणार सुरू?

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड पूर्णपणे पदवीच्या गुणांवर आधारित असेल. बीई (B.E) किंवा बीटेक (B.Tech)मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारित मेरिट लिस्ट तयार केली जाईल. शेवटी, या उमेदवारांना डॉक्यूमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल. या भरतीमध्ये निवड झालेल्या पदवीधर उमेदवारांना 25,000 रुपये मासिक वेतन मिळेल, ज्यामध्ये HPCL कडून 20,500 रुपये आणि भारत सरकारकडून DBT द्वारे 4,500 रुपये असं एकूण 25,000 रुपये वेतन मिळेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp