नवरा परदेशात अन् इकडे बायकोचं कांड, 22 दिवसांच्या नवजात मुलीचा घोटला गळा; सासऱ्याने केला गंभीर आरोप

मुंबई तक

Crime News : एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या क्रूर घटनेमुळे मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची भावना व्यक्त होत असून, ग्रामीण भागात नवजात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सासू आणि सासऱ्यासोबत असलेल्या भांडणामुळे या मुलीचा जीव घेतल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवरा परदेशात अन् इकडे बायकोचं कांड

point

22 दिवसांच्या नवजात मुलीचा घोटला गळा

point

सासऱ्याने केला गंभीर आरोप

Crime News : एका निर्दयी आईने आपल्या अवघ्या 22 दिवसांच्या नवजात मुलीची गळा दाबून हत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या क्रूर घटनेमुळे मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची भावना व्यक्त होत असून, ग्रामीण भागात नवजात मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सासू आणि सासऱ्यासोबत असलेल्या भांडणामुळे या मुलीचा जीव घेतल्याचे बोलले जात आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील ही हृदयद्रावक घटना आहे.

हे ही वाचा : घरात घुसून 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, घाबरुन मुलगी गप्प बसली; यानंतर घडलं भयकंर

कौटुंबिक कलहातून टोकाचे पाऊल

या कुटुंबात गेल्या काही काळापासून सतत वाद सुरू होते. पीडित मुलीचे आजोबा केशर सिंह यांनी सांगितले की, त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न एप्रिल 2025 मध्ये झाले होते.त्यांचा मुलगा परदेशात राहतो. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत होते, मात्र त्यानंतर सून छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण करू लागली. विशेष म्हणजे, सुनेच्या माहेरच्या लोकांनीही तिचीच पाठराखण करत तांत्रिकांच्या सांगण्यावरून सासरच्यांवर आरोप केले होते. यामुळे घरात सतत अशांततेचे वातावरण होते.

समुपदेशनाच्या दिवशीच घडला थरार

घरातील वाढता छळ आणि वादाला कंटाळून केशर सिंह यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली होती, ज्यावर महिला हेल्पलाइनमध्ये समुपदेशन सुरू होते. घटनेच्या दिवशी सकाळीच 'वन स्टॉप सेंटर'चे कर्मचारी त्यांच्या घरी आले होते. तिथे सून आणि सासू-सासऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले, ज्यामध्ये सुनेने वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त केली. सासरच्यांनी तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोलीही दिली, मात्र त्याच दिवशी संध्याकाळी या महिलेने पोटच्या गोळ्याचा जीव घेत सर्वांनाच धक्का दिला.

हे वाचलं का?

    follow whatsapp