Maharashtra Lok Sabha : "महायुतीला 20 जागांचा फटका, मविआला...", यादवांनी वाढवलं भाजपचं टेन्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी महायुतीला २० जागांचा फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा मिळणार? निवडणूक अंदाज काय?
social share
google news

Yogendra Yadav Maharashtra Lok Sabha election 2024 : देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक ८० जागा उत्तर प्रदेशात असून, त्यानंतर महाराष्ट्रात ४८ जागा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा जिंकणं भाजपसाठी महत्त्वाचं बनलेलं आहे. भाजप प्रणित महायुती महाराष्ट्रात किती जागा जिंकेल, हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल. पण, निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी जो अंदाज मांडला आहे. त्याने भाजपचे टेन्शन वाढू शकते. यादवांचा अंदाज नेमका काय आहे, ते पाहूयात... (mahayuti or maha vikas aghadi, who will win more seats? what is Yogendra Yadav Prediction about Maharashtra lok Sabha)

निवडणूक विश्लेषक योगेंद्र यादव महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल अंदाज मांडताना म्हणाले की, यावेळी भाजपला आणि महायुतीतील पक्षांच्या जागा घटणार आहे. मोठा फटका महायुतीला निवडणुकीत बसेल.

हेही वाचा >> "...तर भाजपला फायदा झाला असता", CSDS संचालकांनी मांडला नेमका मुद्दा

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती

ते म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये २०१९ च्या निवडणुकीत भाजपला युतीमध्ये असताना ४२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने २८ जागा लढवल्या आहेत. मित्रपक्ष शिंदेंच्या शिवसेनेने १५ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ५ जागी निवडणूक लढवली आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजप-काँग्रेस किती जागा जिंकणार? 'यांनी' सांगितला फायनल आकडा!

यादव यांनी असा अंदाज मांडला आहे की, "महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षाचे जवळपास २० जागांचे नुकसान होताना दिसत आहे. याचा अर्थ महायुतीला २२ जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला २६ जागा मिळतील."

भाजपला ५ जागांचा फटका

योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्रात भाजपच्या ५ जागा कमी होतील. म्हणजे गेल्यावेळी भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी त्या कमी होऊन १८ जागा भाजपला मिळतील. तर मित्रपक्ष (शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस) लढत असलेल्या २० पैकी चार जागा निवडून येतील. याचा अर्थ त्यांना १६ जागांवर धक्का बसेल",  असा अंदाज त्यांनी मांडला आहे.

ADVERTISEMENT

भाजपला पुन्हा सत्तेत येणार?

योगेंद्र यादव यांनी लोकसभा निवडणूक निकालासंदर्भात अंतिम अंदाजही सांगितला आहे. त्यांनी मांडलेला अंदाज प्रशांत किशोर यांनी ट्विट केला असून, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. यादव यांच्या अंदाजानुसार भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल, तर एनडीएला बहुमत मिळेल.

ADVERTISEMENT

भाजप 240 - 260 
एनडीए 35 - 45 
काँग्रेस 85 - 100
इंडिया 120 - 135

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT