Lok Sabha Election : "...तर भाजपला फायदा झाला असता", CSDS संचालकांनी मांडला नेमका मुद्दा

मुंबई तक

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीबद्दल राजकीय विश्लेषणक संजय कुमार काय म्हणाले?
सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी लोकसभा निवडणुकीबद्दल अंदाज मांडला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र

point

सीएसडीएसचे संजय कुमारांचा अंदाज काय?

point

भाजपला निवडणूक जड का चाललीये?

CSDS Sanjay Kumar on Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी यावेळीही भाजपला निवडणूक सोपी जाईल, असे वातावरण दिसत होते. राजकीय विश्लेषकही असेच म्हणत होते. पण, निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे चित्र बदलले. विरोधी इंडिया आघाडी आणि प्रत्येक राज्यातील विरोधी पक्ष भाजप, एनडीएला आव्हान देताना दिसला. हे नेमकं का घडलं आणि कोणत्या गोष्टीमुळे भाजपला ही निवडणूक जड चालली आहे, याबद्दल सीएसडीएसचे संचालक संजय कुमार यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. (Sanjay Kumar, director of csds prediction on lok Sabha election 2024)

ADVERTISEMENT

संजय कुमार यांनी न्यूज Tak शी बोलताना लोकसभा निवडणुकीबद्दल त्यांची मते मांडली. 

लोकसभा निवडणूक आणि भाजपच्या रणनीतीबद्दल...

सीएसडीएसचे संचालक संजय कुमार म्हणाले की, "आम्ही जो प्री पोल केला होता, त्यात ४० टक्के मतदार भाजपसोबत आहे. पण, त्यात भाजपचं सरकार पुन्हा यावे अशी ज्यांची इच्छा होती. त्यांची संख्या कमी होती. असं वाटतं की, त्यांची अपेक्षा आहे की आता सरकार बदलायला हवे. मी हे म्हणत नाही की सगळ्या मतदारांची पण, याची काही प्रमाणात असे मतदार ज्यांना वाटतंय की सरकार बदललं पाहिजे."

हे वाचलं का?

हेही वाचा >> "मविआचा महायुतीला फटका बसेल"; शिंदेंच्या नेत्याचा अंदाज

ते पुढे म्हणाले की, "एक फॅक्टर असा की, इतर पक्षाशी तुलना करता भाजप चांगली आहे, असेही त्यांना वाटतं होतं. मोदी दमदार नेते आहेत, असे या सर्वेमध्ये दिसत होते. एकदंरीत त्यांना असं वाटत होतं की, सरकार बदललं तर चांगली गोष्ट आहे. कारण बदलण्याची चिन्हे नाहीत, पर्याय नाही. विरोधकांकडे नेता नाही, मुद्दे नाहीत, असे त्यांना एप्रिलपर्यंत तरी वाटतं होतं."

भाजप २७२ जागाही जिंकेल की नाही, अशी चर्चा का सुरू झाली. मोदी, शाह, निर्मला सीतारामन यांना गुंतवणूकदारांना सांगावं लागलं की आम्ही परत येतोय? काही बदललं आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "फडणवीसांनी फोन केला अन्...', देशमुखांनी सांगितला ठाकरेंचं सरकार पडण्यापूर्वीचा किस्सा

संजय कुमार म्हणाले, "या प्रकारची परिस्थिती आणि ज्यांच्या नावाचा उल्लेख केला. मला वाटतं की, जेव्हा त्यांना अशा प्रकारची विधाने करावी लागत आहे, तर कुठे न कुठे त्यांना जमिनीवरील परिस्थितीचा अंदाज असावा."

ADVERTISEMENT

"भाजपला फायदा झाला असता, जर लोकसभा निवडणूक एका राष्ट्रीय मुद्द्यावर झाली असती. म्हणजे कुठला तरी असा मुद्दा असता, जो देशभरात चालला असता. असे कुठेही दिसले नाही. असा कोणताही मुद्दा नाही, ज्याला प्रत्येक राज्यात प्रतिसाद मिळतोय", असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

हेही वाचा >> "भाजप 370 जागा जिंकणं अवघड, 4 राज्यात बसू शकतो झटका"

"२०१९ आणि २०१४ मध्ये जसा राष्ट्रीय मुद्दा होता. तसा यावेळी नाही. त्यामुळे झाले असे की, राष्ट्रीय मुद्द्यावरून सरकून आता राज्यांच्या स्तरावर ही निवडणूक झाली आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे मुद्दे, छोटे मुद्दे, ज्याच्या आधारावर लोकांनी मतदान करायचं ठरवलं. मला वाटतं की, हेच कारण आहे की, परसेप्शन बदललं आहे. वस्तुस्थिती बदलली की नाही, हे आपण सांगू शकत नाही. परसेप्शन बदलल आहे. त्यावर सगळे बोलताहेत. आता असं वाटतंय की, एक वेळ होती की, जेव्हा वाटतं भाजप प्रचंड बहुमत मिळवत आहे. आज अशी चर्चा होतेय की, निवडणूक रंगतदार झाली आहे", असे भाष्य कुमार यांनी केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT