मीन राशीत त्रिग्रही योग, होळीपासून पालटणार 'या' राशींचे नशीब; संपत्तीत होणार अफाट वाढ!
March Rashifal 2026 : वर्षाचा तिसरा महिना मार्च लवकरच सुरू होणार आहे. मार्चचा हा महिना अनेक अर्थांनी खास असेल. या महिन्यात सूर्य आणि शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे शनिदेव आधीपासूनच विराजमान आहेत. मीन राशीमध्ये सूर्य-शुक्र-शनीचा 'त्रिग्रही योग' देखील तयार होईल. दुसरे म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील लागणार आहे. हे चंद्रग्रहण योगायोगाने होळीसोबतच येत आहे. अशा परिस्थितीत, ज्योतिषांचे म्हणणे आहे की, होळीच्या वेळी ग्रहांची चाल तीन राशींसाठी शुभ संकेत देत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मीन राशीत त्रिग्रही योग
होळीपासून पालटणार 'या' राशींचे नशीब
संपत्तीत होणार अफाट वाढ!
March Rashifal 2026 : वर्षाचा तिसरा महिना मार्च लवकरच सुरू होणार आहे. मार्चचा हा महिना अनेक अर्थांनी खास असेल. या महिन्यात सूर्य आणि शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहेत, जिथे शनिदेव आधीपासूनच विराजमान आहेत. मीन राशीमध्ये सूर्य-शुक्र-शनीचा 'त्रिग्रही योग' देखील तयार होईल. दुसरे म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील लागणार आहे. हे चंद्रग्रहण योगायोगाने होळीसोबतच येत आहे. अशा परिस्थितीत, ज्योतिषांचे म्हणणे आहे की, होळीच्या वेळी ग्रहांची चाल तीन राशींसाठी शुभ संकेत देत आहे. हा दुर्मिळ योग कोणत्या राशींना लाभ देणार आहे, ते जाणून घेऊया.
हे ही वाचा : नवरा परदेशात अन् इकडे बायकोचं कांड, 22 दिवसांच्या नवजात मुलीचा घोटला गळा; सासऱ्याने केला गंभीर आरोप
वृषभ : मार्च महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. नवीन रोजगार किंवा नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विवाहात येणारे अडथळे दूर होतील. विवाहित लोकांना सासरच्या मंडळींकडून सहकार्य मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. सहज धनप्राप्ती होईल. खर्च आणि गुंतवणूक गरजेनुसारच राहील. करिअरच्या क्षेत्रात तुम्ही मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. करिअरमधील तुमची कामगिरी वाखाणण्याजोगी असेल. व्यापार आणि गुंतवणुकीशी संबंधित लोकांना मोठा लाभ होईल.
तूळ : या महिन्यात तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. ज्या कामात हात घालतील, त्यात यश मिळण्याचे योग येतील. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना नवीन सुवर्णसंधी मिळू शकते. एखादा चांगला प्रकल्प तुमच्या हाती लागू शकतो. अडकलेले काम किंवा अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. अधिकारी वर्ग तुमच्या कामावर समाधानी राहील. तुमच्याविरुद्ध कट रचणाऱ्यांची पोलखोल होईल. आर्थिक समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. सामाजिक ओळख आणि संपर्कांचा विस्तार होईल.










