Lok Sabha Election 2024: BJP जिंकणार की नाही, सट्टा बाजाराने कोणाचं वाढवलं टेन्शन?

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

betting market prediction on lok sabha election 2024 bjp congres nda india alliance rahul gandhi pm narendra modi
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सहज विजय मिळण्याची शक्यता आहे.
social share
google news

Satta Bazar on Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्पे यशस्वीरीत्या पार पाडले आहे. आता शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला होणार आहे. तत्पुर्वीच लोकसभा निवडणुकीच्या निकालासंबंधीत अनेक अंदाज समोर येऊ लागले आहे. त्यानुसार आता भाजप (BJP) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) सहज जिंकेल, पण त्यांना 400 पारचा टप्पा गाठता येणार नाही, असा अंदाज सट्टाबाजाराने व्यक्त केला आहे. (betting market prediction on lok sabha election 2024 bjp congres nda india alliance rahul gandhi pm narendra modi)

लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज जाणून घेण्यासाठी आजतक आणि इंडिया टूडेने सट्टाबाजारातील मुंबईतील टॉप बुकींशी बातचित केली. यामध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सहज विजय मिळण्याची शक्यता सट्टा बाजाराने व्यक्त केली आहे. दरम्यान भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पार जागा जिंकण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे यावर बुकींच म्हणणं काय आहे? तेही जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Ravindra Dhangekar : धंगेकर रस्त्यावर, पण टार्गेट कोण? समजून घ्या अर्थ

भाजप 'इतक्या' जागा जिंकणार

पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी म्हणजे सुरुवातीला भाजपसाठी मतांची संख्या जास्त होती. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप 295 ते 305 जागा जिंकण्याचा अंदाज मुंबईतील टॉप बुकींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील टॉप बुकींनुसार भाजपला 400 जागा गाठता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तर काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतील टॉप बुकींच्या अंदाजानुसार, मतदानापूर्वी सुरुवातीला सट्टेबाजीने भाजपला 315 ते 325 तर काँग्रेसला 45 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र तीन टप्प्यातील मतदानानंतर भाजपची घसरण झाली आहे. त्यावेळी भाजपला 270 ते 280 जागा मिळण्याचा अंदाज होता. तर काँग्रेस 70 ते 80 जागांच्या दिशेने चांगली वाढ दर्शवत होती. मात्र आता पुन्हा 6 टप्प्यातील मतदानानंतर परिस्थिती बदलली आहे. सट्टेबाजारातील बुकींनी आता भाजप 295 ते 305 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काँग्रेसला 55 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : Pune Accident प्रकरणात तीन जणांना अटक, आमदार सुनील टिंगरे गायब?

एका बुकीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सट्टा बाजाराने कधीही 400 पार घोषणेचे समर्थन केले नाही. सट्टेबाजीच्या बाजारभावानुसार 350 जागा देखील शक्य नाहीत."

ADVERTISEMENT

'या' राज्यात कोणाला किती जागा मिळणार? 

महाराष्ट्र : एनडीए आघाडीला 28 जागा
उत्तर प्रदेश : एनडीएला आघाडीला  64 ते 66 जागा 
गुजरात : तिसऱ्यांदा क्लीन स्वीप होईल 

ADVERTISEMENT

'या' प्रतिष्ठीत जागांवर कोण जिंकणार? 

 • अमेठी : अमेठीतून भाजप जिंकणार असल्याचा अंदाज आहे. या जागेवरून स्मृती इराणीने लोकसभा लढवली होती. 
 • रायबरेली : रायबरेलीत काँग्रेसला यश मिळण्याचा अंदाज, राहुल गांधींनी या जागेवरून लोकसभा लढवली. 
 • वायनाड :  वायनाडची जागा काँग्रेस जिंकण्याचा अंदाज, या जागेवरून राहुल गांधींनी लोकसभा लढवली होती. 
 • नागपूर :  नागपूरमध्ये भाजपच्या विजयाचा अंदाज,  नितीन गडकरींनी लोकसभा लढवली. 
 • चंद्रपुर : चंद्रपुरमध्ये काँग्रेस जिंकण्याचा अंदाज, प्रतिभा धानोरकर निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
 • गांधीनगर :  गांधीनगर मतदारसंघातून भाजप 5 लाखांहून अधिक मतांनी विजयी होण्याचा अंदाज आहे. अमित शहांनी या जागेवरून लोकसभा लढवली होती. 
 • मैनपुरी : मैनपुरी समाजवादी पार्टीला यश मिळण्याचा अंदाज, डिंपल यादवने या जागेवरून लोकसभेच्या रिंगणात होत्या. 
 • लखनऊ :  ही जागा भाजप अडीच लाख मतांच्या फरकाने जिंकेल असा अंदाज आहे. राजनाथ सिंह येथून निवडणूक लढवत आहेत.
 • मथुरा : ही जागा भाजप 2 लाखांहून अधिक मतांनी जिंकण्याचा अंदाज आहे. हेमा मालिनी यांनी या जागेवरून लोकसभा लढवली होती. 
 • यवतमाळ :  यवतमाळची जागा ठाकरेंच्या पारड्यात येण्याचा अंदाज, संजय देशमुखने या जागेवरून निवडणूक लढवली होती. 
 • अमरावती : अमरावतीची जागा काँग्रेस जिंकणार, बळवंत वानखेडेने या जागेवरून लोकसभा लढवली.
 • बारामती :  बारामतीत सुप्रिया सुळेन निवडणूक जिंकण्याचा अंदाज 
 • मुंबई उत्तर मतदारसंघ : भाजप 3 लाखांहून अधिक मतांनी विजयी होण्याचा अंदाज, पीयूष गोयल निवडणूक लढवत आहेत.
 • कोल्हापूरची :  कोल्हापूरची जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा अंदाज, शाहू छत्रपती महाराज ही निवडणूक लढवत आहेत.
 • चुरू :  काँग्रेसच्या विजयाच्या अंदाज 
 • झुंझुनू : काँग्रेस जिंकण्याचा अंदाज
 •  कोटा जागा : भाजपच्या विजयाचा अंदाज 
 • बारमेर : काँग्रेसच्या विजयाचा अंदाज 
 • हैदराबाद: ही जागा एमआयएम जिंकण्याचा अंदाज, असदुद्दीन ओवेसी निवडणूक लढवत आहेत. 
 • नवसारी :  ही जागा भाजपचे उमेदवार सीआर पाटील  5 लाखांहून अधिक मतांनी जिंकण्याचा अंदाज.
 • धारवाड : धारवाडमध्ये भाजपचं कमळ फुलण्याचा अंदाज 
 •   मेरठ : मेरठची जागा भाजप जिंकण्याचा अंदाज 
 • कन्नौज : समाजवादी पार्टी जिंकणार,  अखिलेश यादव निवडणूक लढवत आहेत.
 • नाशिकची :  ही जागा एकनाथ शिंदेंची शिवसेना जिंकण्याचा अंदाज, हेमंत गोडसेंनी निवडणूक लढवत आहेत.
   

  follow whatsapp

  ADVERTISEMENT