Vidhan Parishad Election : शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, अजित पवारांनी उतरवला उमेदवार

मुंबई तक

Vidhan Parishad Election 2024 : महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी घडलेले जागावाटपाचे नाट्य विधान परिषद निवडणुकीतही घटताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत कुरघोड्या.
Vidhan Parishad Election 2024 : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक २०२४ महाराष्ट्र

point

महायुतीमध्ये जागावाटपावरून कुरघोड्या

point

शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

Vidhan Parishad Election 2024 Mahayuti : लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत निर्माण झालेला पेच विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, पुन्हा एकदा भाजपने शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षामध्ये कुरघोड्या सुरू झाल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. (Vidhan parishad election seat sharing, BJP Claims on Shiv Sena Seat)

लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीत जागांच्या वाटाघाटी सुरू राहिल्या. त्याचा फटका प्रचारात बसल्याची चर्चा असताना आता विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे.

हेही वाचा >> दोन्ही ठाकरेंनी उतरवले उमेदवार, महायुती आणि मविआत पेच काय? 

मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ या तीन जागांवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिंदेंची शिवसेना असा हा पेच निर्माण झाल्याची सद्यस्थिती आहे. 

शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले शिंदेंच्या शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते तयारीही करत आहेत. पण, भाजपने या जागेवर दावा केला आहे. आरएसएसशी संबंधित किरण शेलार यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp