वासनांध काकीचे पुतण्यासोबत होते शारीरिक संबंध, पण काकासोबत...

मुंबई तक

Crime News : काकीसोबत पुतण्याचे प्रेमसंबंध असल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर पुतण्यानेच काकीसोबत मिळून काकाच्या हत्येचा कट रचून हत्या केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काकीसह पुतण्याने कट रचून काकाला संपवलं  

point

नेमकं काय घडलं? 

Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूर देहातच्या अमरोधा या शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 42 वर्षीय बसीर यांचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत त्यांच्याच घरात आढळून आला होता. या प्रकरणात पत्नी शमा परवीन यांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या पतीने स्वत: गळा चिरून आत्महत्या केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण संशयास्पद असल्याचे मानले जात होते. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि अहवाल समोर आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गंभीर असल्या प्रकरणी चौकशी केली.

हे ही वाचा :  चंद्रपूर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपचा दणदणीत विजय, तर 2025-26 मध्ये कशी असेल रणनीती?

नेमकं काय घडलं? 

या प्रकरणात आठ दिवसानंतर, पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला. या खून प्रकरणात त्यांनी सांगितलं की, नातेसंबंधात लाज आणणारी घटना आहे. दरम्यान, बसीरची हत्या दुसरी तिसरी कोणीही केली नसून त्याच्याच पुतण्याने केली होती. त्याचं कारण आता समोर आलं आहे. पुतण्याचे आपल्याच काकीसोबत अवैध संबंध सुरु होते.

मृताच्या पत्नीच्या कॉल रेकॉर्डची तपासणी

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असून, प्रेमात वेडे झालेल्या काकीसह पुतण्याने बसीरचा खून केला. पोलिसांनी मोबाइल सीडीआर आणि कठोर चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण उलगडले. तपासादरम्यान, पोलिसांनी मृताच्या पत्नीच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली होती, तेव्हा दिसून आले की, ती आपल्याच पुतण्याशी वारंवार संवाद साधत होती. नंतर, पोलिसांनी शमा परवनीची चौकशी केली. त्याचदरम्यान, पोलिसांना पुतण्या चांद बाबूच्या खोल जखमा दिसू लागल्या होत्या, अशातच तो वारंवार पोलिसांच्या निगराणीखाली होता.

काकीसह पुतण्याने कट रचून बसीरचा गळा चिरला 

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शमा परवीन आणि मृताचा पुतण्या समर समीम उर्फ चांदबाबू यांचे जवळचे नाते होते, ज्या नात्याला मृताने विरोध केला होता. त्याच काळात बसीरच्या मुलांचा उपचार आणि पैशांच्या देवानघेवाणीतून वाद झाला होता. मृताच्या पत्नीने तिच्या प्रियकरासह, तिच्या पुतण्यासोबत मिळून तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. रचलेल्या कटाप्रमाणे काकू आणि पुतण्याने बसीरचा गळा चाकूने चिरला आणि त्याची हत्या केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp