Vidhan Parishad Election : दोन्ही ठाकरेंनी उतरवले उमेदवार, महायुती आणि मविआत पेच काय?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले उमेदवार.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक २०२४

point

महाराष्ट्रात चार जागांसाठी निवडणूक

point

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केले उमेदवार

Vidhan Parishad Election 2024 : राज्यात विधान परिषदेतील चार रिक्त होत असलेल्या जागांसाठी निवडणूक होत आहे.  मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 26 जून रोजी होणार आहे, तर मतमोजणी एक जुलैला होणार आहे. या चार जागांमुळे पुन्हा एकदा महायुतीत रस्सीखेच सुरू झाली आहे. तर महाविकास आघाडीत अद्याप शांतता दिसत आहे. (Uddhav Thackeray and Raj Thackeray have announced their candidates for the Legislative Council elections in Maharashtra)

कोणत्या मतदारसंघात कोणाची उमेदवारी जाहीर? कोणाच्या उमेदवाराची चर्चा? तर महाविकास आघाडी महायुतीत कोणता पक्ष कुठली जागा लढवणार?

मुंबई पदवीधर मतदारसंघ -

मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये याआधी शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस हे आमदार होते. आता मुंबई पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर जरी केला असला, तरीही जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना शिंदे गटाने उमेदवार द्यावा असा शिवसेना नेत्यांचा आहे. त्यामुळे माजी मंत्री डॉ. दीपक सावंत हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. दुसरीकडे या जागेसाठी भाजप सुद्धा महायुती उमेदवार देण्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबई शिक्षक मतदार संघ -

मुंबई शिक्षक मतदारसंघात या आधी शिक्षक भारतीचे कपिल पाटील हे आमदार होते. आता शिक्षक भारतीकडून कपिल पाटील हे निवडणूक लढवणार नसून, सुभाष मोरे यांना शिक्षक भारतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

तर मुंबई शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीने मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये उमेदवार देण्यासंदर्भात  निर्णय घेतला नसून, महायुतीत उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. महायुतीची सुकाणू समिती या संदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे. 

ADVERTISEMENT

कोकण पदवीधर मतदारसंघ-

कोकण पदवीधर मतदारसंघांमध्ये भाजपचे निरंजन डावखरे हे आमदार होते. त्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा  ही जागा भाजपकडूनच लढवली जाणार असून, उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निरंजन डावखरे यांच्याच नावाची चर्चा आहे. 

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीमध्ये कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने  किशोर जैन यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र याच कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आग्रही असून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला उतरवला आहे. त्यामुळे महायुतीसमोर आव्हान असणार आहे. 

नाशिक शिक्षक मतदार संघ -

नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे हे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र आता या ठिकाणी नेमकं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला उमेदवारी देणार यावर दोन्हीहीकडून चाचणी सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT