Lok Sabha Election 2024: 'ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पायावर...', अमित शाहांचा थेट वार!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

amit shah criticize udhhav thackeray sharad pawar rahul gandhi india alliance jalana lok sabha election 2024 raosaheb danve mahayuti candidate
12 लाख करोडचा घोटाळा करणाऱ्या इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतोय
social share
google news

Amit Shah Criticize Udhhav Thackeray : उद्धव ठाकरे दोन दिवसांनी येथे येणार आहेत. त्यावेळेस जालनावासियांनो तुम्ही त्यांना विचारा? संभाजीनगरच्या नावाला का विरोध केलात? उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पायावर पडलेत, अशी बोचरी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. (amit shah criticize udhhav thackeray sharad pawar rahul gandhi india alliance jalana lok sabha election 2024 raosaheb danve mahayuti candidate) 

ADVERTISEMENT

जालना लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अमित शाह बोलत होते.यावेळी अमित शाह यांनी ठाकरे आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला चढवला होता. इंडी आघाडीच्या एका मंत्र्याकडून 20 करोडची रोकड जप्त केली. काँग्रेसच्या एका खासदाराकडून साडे तीनशे करोड रूपये जप्त करण्यात आले होते. ममताजींच्या मंत्र्याजवळून 50 करोड रूपये पकडले गेले होते. अशाप्रकारे 10 वर्षात 12 लाख करोडचा घोटाळा करणाऱ्या इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी करतोय, अशी टीका अमित शाह यांनी इंडिया आघाडीवर केली. 

हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

शरद पवारांवर टीका 

अमित शाह पुढे म्हणाले, इंडिया आघाडी, काँग्रेस आणि शरद पवार कंपनीने वर्षभर राम मंदिराला विरोध केला. राम मंदिरांच्या सोहळ्यात वेगवेगळे बहाणे करून बहिष्कार टाकला. राम मंदिराच्या सोहळ्याला गेले तर त्यांची वोट बँक त्यांच्याशी नाराज होईल. पण मोदींनी राम मंदिराच केसही जिंकली, भूमिपूजनही केलं आणि 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करून जय श्रीराम देखील केलं. 

हे वाचलं का?

उद्धव ठाकरे दोन दिवसांनी येथे येणार आहेत. जालनावासियांनो तुम्ही त्यांना विचारा संभाजीनगरच्या नावाला विरोध केलात? औरंगाबादचे संभाजीनगर करावे ही बाळासाहेबांचीच इच्छा होती. पण उद्धव ठाकरे सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पायावर पडली आहे, अशी टीका अमित शाह यांनी केली. 

हे ही वाचा : Mahadev Jankar : 'मेलो तरी चालेल पण कमळावर लढणार नाही'

अमित शाह पुढे म्हणाले, जालन्यात उद्धव ठाकरे आल्यावर त्यांना विचारा, राम मंदिर बनवलं चांगल झालं की वाईट? 370 कलम हटवलं, तिहेरी तलाक कायदा रद्द केला, चांगल झालं की वाईट? पण आता तिहेरी तलाक कायदा पुन्हा अस्तित्वात आणणाऱ्यांसोबत ते (उद्धव ठाकरे) बसलेत. शरीयाच्या आधारावर त्यांना हा देश चालवायचा आहे. उद्धव ठाकरे पदासाठी या अशा पक्षासोबत बसला आहे, अशी टीका देखील अमित शाह यांनी केली. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT