Mahadev Jankar : 'मेलो तरी चालेल पण कमळावर लढणार नाही', जानकर हे काय बोलून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mahadev jankar big statement parbhani loksabha election 2024 sunetra pawar ajit pawar baramati lok sabha
मला माझ्याच पक्षाचं आमदार खासदार व्हायचं आहे. माझं ठरलेले आहे.
social share
google news

Mahadev Jankar, Parbhani Lok Sabha 2024 : 'मी मेलो तरी चालेल पण मला कमळावर, बाणावर आणि हातावर लढायचं नाही', असं मोठं विधान महायुतीचे परभणीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले आहे. जानकरांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे महादेव जानकर (Mahadev Jankar) सध्या राष्ट्रवादीच्या जागेवरून लोकसभा लढवतायत. तर महायुतीचा ते एक घटक पक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत. (mahadev jankar big statement parbhani loksabha election 2024 sunetra pawar ajit pawar baramati lok sabha)  

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी महादेव जानकर बोलत होते. बारामतीतून सुनेत्रा पवार 5 हजार मतांनी निवडून येतील, असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तसेच पवार साहेब मोठे नेते आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी काय केलं महादेव जानकरला बारामतीत टाकून खेळवून ठेवलं. मला जर बारामती शहराने थोड प्रेम केलं असतं ना. तर त्यावेळेसच मी त्यांचा पराभव केला असता. मला वेळ कमी मिळाली होती. माझं चिन्ह सुद्धा लोकांसमोर गेलं नव्हतं,असे जानकर यांनी सांगितलं. 

हे ही वाचा : पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला

तसेच मी मेलो तरी चालेल पण मला कमळावर, बाणावर आणि हातावर लढणार नाही. मी पक्ष काढलेला आहे. मला माझ्याच पक्षाचं आमदार खासदार व्हायचं आहे. माझं ठरलेले आहे, माझ्याच पक्षातून मी आमदार,खासदार होईन. मी आता आमदार आहेच,माझ्याच पक्षातून आमदार आहे. माझे 4 आमदार मी निवडून आणले. मी युती कोणाशीही करेन ना. मी दिल्लीला जाईन तेही माझ्याच चिन्हावर असे देखील महादेव जानकर म्हणाले. 

हे वाचलं का?

माझी युती कुणाशी होईल.पण मी माझी विचारधारा घेऊन यांच्याशी दोस्ती करेन असे विधान करून जानकरांनी युतीचा इतिहास सांगितला. 'गोपीनाथ मुंडेंसमोर माझी पहिली सभा झाली. मुंडे साहेबांनी मला भाजपसोबत युतीत घेतलं आणि तिथून आम्ही आघाडीत आलो. आता देवेंद्र फडणवीसांशी माझे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदींशी माझे चांगले संबंध आहेत,असे जानकर यांनी सांगितले. 

हे ही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात सुप्रिया सुळेंमुळे पेच -शिंदेंच्या नेत्याचं विधान

तसेच मोदी साहेबांनी आणि अमित शाह यांनी मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डायरेक्ट सांगितलं. तर महादेव ऐकणार नाही त्याला त्याच्या चिन्हावर लढू द्या.आम्ही म्हटलं आमच्या चिन्हावर असेल तर द्या, नाहीतर देऊ नका. त्यामुळे मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे, असे जानकर म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT