हात-पाय घट्ट धरले, गळा चिरला, 18 वर्षीय तरुणाच्या शरीरावर 35 वार केले; 'या' कारणामुळे केली हत्या
Crime News : अनैतिक संबंधाच्या वादातून एका 18 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मुख्य आरोपीच्या पत्नीसोबत या तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याच संशयातून या तरुणावर 35 वार करुन निर्घृणपणे संपवण्यात आले. अभिषेक असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हात-पाय घट्ट धरले, गळा चिरला
18 वर्षीय तरुणाच्या शरीरावर 35 वार केले
'या' कारणामुळे केली हत्या
Crime News : अनैतिक संबंधाच्या वादातून एका 18 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन सख्ख्या भावांना अटक केली असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मुख्य आरोपीच्या पत्नीसोबत या तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्याच संशयातून या तरुणावर 35 वार करुन निर्घृणपणे संपवण्यात आले. अभिषेक असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील ही घटना आहे.
हे ही वाचा : दोन मुलांचा बाप असूनही दया-माया दाखवली नाही, विकृताने चिमुकलीला दातांनी इतकं छळलं की कोमात गेली
मृतदेह सापडल्यानंतर खळबळ
अभिषेकची हत्या 6 फेब्रुवारीच्या रात्री अत्यंत क्रूरपणे करण्यात आली होती. 7 फेब्रुवारीला त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोस्ट मार्टम अहवालात अभिषेकच्या शरीरावर धारदार शस्त्राने तब्बल 35 वेळा वार करण्यात आल्याचे समोर आले. सुरुवातीला हे प्रकरण जुन्या वादातून झाल्याचे वाटत होते, मात्र पोलीस तपासात आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रेमसंबंधाचा आणि संशयाचा अँगल समोर आला. धुक्यामुळे सुरुवातीचे फुटेज अस्पष्ट होते, पण मद्याच्या दुकानाबाहेरील कॅमेऱ्यांनी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळवून दिले.
अनैतिक संबंधांचा संशय
तपासादरम्यान समोर आले की, मुख्य आरोपीला अभिषेकचे आपल्या पत्नीसोबत अवैध संबंध असल्याचा संशय होता. याच रागातून त्याने हत्येचा कट रचला. घटनेच्या रात्री आरोपींनी अभिषेकला पार्टीच्या बहाण्याने पेवनपुर गावाजवळ नेले. तिथे सर्वांनी मिळून मद्यप्राशन केले. अभिषेक नशेच्या धुंदीत असताना, दोन्ही कामगार भावांनी त्याचे हात-पाय घट्ट पकडले आणि मुख्य आरोपीने चाकूने त्याचा गळा चिरून शरीरावर अनेक वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपी त्याचा मोबाईल आणि इतर सामान घेऊन पसार झाले.










