Baramati : पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा शरद पवारांवर जोरदार हल्ला, नवीन गौप्यस्फोट काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ajit pawar criticize sharad pawar on morning oath devendra fadnavis baramati lok sabha election 2024
मी शब्दाचा पक्का आहे म्हणूनच 2019 मध्ये फडणवीसांसोबत सरकार बनवलं.
social share
google news

Ajit Pawar Criticize Sharad Pawar : तिसऱ्या टप्प्याचे मतदान संपताच उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीची आठवण काढत शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी शब्दाचा पक्का आहे म्हणूनच 2019 मध्ये फडणवीसांसोबत सरकार बनवलं, असा चिमटा अजित पवारांनी शरद पवारांना काढला.तसेच मी तरी त्यांना 30-35 वर्ष साथ दिली, साहेबांनी 11 वर्षात चव्हाण साहेबांना सोडलं, अशी बोचरी टीका अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर (Sharad Pawar) केली आहे.  (ajit pawar criticize sharad pawar on morning oath devendra fadnavis baramati lok sabha election 2024)

ADVERTISEMENT

शिरूरचे महायुतीच उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीवर पुन्हा एकदा भाष्य केले. ''मी शब्दाचा पक्का आहे म्हणूनच 2019 मध्ये फडणवीसांसोबत सरकार बनवलं. कारण माझ्याच चुलत्यांनी सांगितलं होतं त्यांच्यासोबत सरकार बनवायला. अरे मला मीटींगला घेऊन जायचे. नंतर तेच बदलले. मी म्हटलं 6 मीटींग झाल्यावर असं कसं बदलायचं. हे कसं काय चालेल. मी शब्द दिला आहे. मी शब्द पाळणार नंतर काय व्हायचंय ते होईल. याप्रमाणे मी कुणालाही दुखवल नाही, असे अजित पवारांनी सांगितले. 

हे ही वाचा : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विलिनीकरणात सुप्रिया सुळेंमुळे पेच -शिंदेंच्या नेत्याचं विधान

अजित पवार पुढे म्हणाले, या वयात दादांनी पवार साहेबांना सोडायला नाही पाहिजे होतं, असे बोलतात. पण मी तर 30-35 वर्ष साथ दिली.साहेबांनी 11 वर्षातच चव्हाण साहेबांना सोडलं. चव्हाण साहेब म्हणत होते असं करू नका. त्यांनी फोनही घेतला नाही. लोक माझ्या संगाती पुस्तकात या सगळ्या गोष्टी असल्याचेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.  

हे वाचलं का?

मी 35 वर्ष साथ दिली. आता  60 च्या वर गेलो आहे, कधीपर्यंत थांबायचं मी आता. मी अनेकवेळा साहेबांना सांगितलं आहे. साहेब आता बघुद्या बघुद्या, साहेब म्हणायचे नाही मी सांगतो तेच करायचं, असे साहेब म्हणायचे असे अजित पवार यांनी सांगितले.  कधीतरी आम्हालाही वाटतं ना, बघाव म्हणून..साठीच्या वर गेलो मी कधी बघायचं, मला काही कळत नाही तुमचं? मी करतोय ना व्यवस्थित, चुका करत असेन तर कान धरा,असे देखील अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा : 'अडीच कोटी द्या EVM हॅक करतो', ठाकरेंच्या नेत्याला ऑफर; प्रकरण नेमकं काय?

अजित पवार पुढे म्हणाले,  'अरे आम्ही कुठं साहेबांना सोडलं, आम्ही साहेबांना समजून सांगत होतो. चव्हाण साहेब म्हणायचे सत्ता असल्याशिवाय तुम्ही बहुजन, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांना आदिवासी समाजाला मदतच करू शकत नाही. माझ्याकडे सत्ता नाही, दिलीपरावांकडे सत्ता नाही, नुसतं म्हणायचं आम्ही असं करू तसं करू, असे अजित पवार म्हणाले. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT