Lok Sabha Election 2024 : ''मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसने...''

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp keshav upadhye criticize congress garantee rahul gandhi mallikararjun kharge lok sabha election 2024
एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही
social share
google news

BJP keshav upadhye criticize Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मोदी की गॅरंटी'ला आव्हान देण्यासाठी काँग्रेसने 'घर घर गॅरंटी'च्या मोहिमेला सुरूवात केली आहे. काँग्रेसच्या या गॅरंटीवर आता भाजपकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेसने 5 गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड असल्याचा टोला आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. (bjp keshav upadhye criticize congress garantee rahul gandhi mallikararjun kharge lok sabha election 2024) 

ADVERTISEMENT

केशव उपाध्येय पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या गॅरंटीची खिल्ली उडवली आहे. अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली. मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे काँग्रेसने 5 गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना मेड वस्तूंसारखी असल्याचा टोला त्यांनी लगावला. मोदी सरकारची नक्कल करून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशाला दाखवून दिले. केवळ एका घराण्याच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या काँग्रेसच्या नव्या गॅरंटीमुळे आता देशातील जनता पुन्हा फसणार नाही,अशी टीका उपाध्ये यांनी काँग्रेसवर केली आहे. 

हे ही वाचा : अजित पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काय दिले आदेश?

पंतप्रधान मोदी यांनी देशाला विकासाची गॅरंटी दिली. ती पूर्ण करून दाखवली. पण गरीबी हटाव नारा देणाऱ्या काँग्रेसच्या काही मोजक्या नेत्यांची आणि पक्षाला वेठीस धरणाऱ्या गांधी घराण्याची गरीबी हटली, देश मात्र अधिकाधिक गरीब होत गेला, अशी टीका देखील उपाध्ये यांनी काँग्रेसवर केली. शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीच्या नावाखाली बँकांच्या तिजोऱ्या भरून शेतकऱ्याच्या पदरात मात्र कर्जाचे ओझे कायमच ठेवण्याचा पराक्रम काँग्रेसी सत्ताधीशांनी केला, असा घणाघात देखील उपाध्ये यांनी काँग्रेसवर केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Prakash Ambedkar : अमरावतीत नवा ट्विस्ट! आंबेडकरांनी उमेदवार घेतला मागे

काँग्रेसच्या प्रत्येक घोषणेतील पोकळपणा जनतेस माहीत आहे, याची जाणीव असूनही मोदी यांची नक्कल करताना काँग्रेसने आपली अक्कल एवढी गहाण टाकली, की मोदी मंदिरात गेले की यांचे नेते मंदिरांच्या पायऱ्या झिजवतात, मोदींनी गंगास्नान केले की यांचे नेते डुबकी मारतात, मोदी यांनी प्रचारयात्रा काढल्या की यांचे नेते देशात पदभ्रमणासाठी बाहेर पडतात. अशा नक्कल करण्याच्या हतबलपणामुळेच आता काँग्रेसने पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटी दिल्या आहेत. अशा पाच पंचवीस फसवणुकांतून जनता यापूर्वीही गेलेली असल्याने, आता नक्कल देखील कामाला येणार नाही, अशी खिल्ली उपाध्ये यांनी उडवली.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT