NCP supreme court : अजित पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काय दिले आदेश?
NCP symbol case Supreme Court Update : सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या घड्याळ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात अजित पवार गटाला महत्त्वाचे आदेश दिले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाद सुनावणी

घड्याळ चिन्हाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात काय सांगितले?
Ncp Symbol Supreme Court Latest News : (संजय शर्मा, दिल्ली) घड्याळ चिन्हा संदर्भातील याचिकेवर आज (4 मार्च) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. अजित पवार गटाकडून करण्यात आलेली मागणी फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाने काय युक्तिवाद केला. अजित पवार गटाकडून काय उत्तर देण्यात आले आणि न्यायालयाने काय आदेश दिले?
घड्याळ चिन्हाचा वापर करताना त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाचे उल्लंघन केले जात असल्याच्या शरद पवार गटाच्या अर्जावर आणि आदेशात काही बदल करण्याच्या अजित पवार गटाच्या मागणीवर सुनावणी झाली.
अजित पवार गटाला दिलेले 'घड्याळ' चिन्हाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन आहे, असा उल्लेख पक्षाच्या प्रत्येक जाहिरात, प्रचार पत्रक, ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपमध्ये करण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 19 मार्च रोजी दिले होते.
दरम्यान, न्यायालयाच्या आदेशातील शेवटची ओळ वगळ्याची मागणी करणारा अर्ज अजित पवार गटाने केला होता. या संपूर्ण प्रकरणावर न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंठपीठासमोर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला.