Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा सुटला? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर काय ठरलं ?
Madha Lok Sabha Constituency : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत फडवणवीसांच्या मध्यस्थीनंतर तिढा सुटल्याची चर्चा आहे. सगळ्याच नेत्यांनी माढा लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्याचं काम करण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT
Madha Lok Sabha Constituency : अभिजीत करंडे, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून माढा लोकसभेच्या जागेने भाजपची डोकेदुखी प्रचंड वाढवली होती. या संदर्भात आज माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत फडवणवीसांच्या मध्यस्थीनंतर तिढा सुटल्याची चर्चा आहे. सगळ्याच नेत्यांनी माढा लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकून आणण्याचं काम करण्याची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता आज फडणवीसांच्या बंगल्यावर काय घडामोडी घडल्या? हे जाणून घेऊयात. (devendra fadnavis sagar bunglow meeting madha loksabha seat rahjitsingh naik nimbalkar candiate ramraje nimbalkar and dhairyshil mohite patil vijay singh mohite patil)
ADVERTISEMENT
माढ्यासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी आज देवेंद्र फडणवीसांनी सांगर बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला रामराजे निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील,जयकुमार गोरे असे अनेक नेते उपस्थित होते.
हे ही वाचा : शरद पवारांना सुप्रीम कोर्टात झटका अन् दिलासाही! काय दिले आदेश?
या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आज रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही नेत्यांसोबत तब्बल दोन तास चर्चा केली. या चर्चेत फडणवीसांनी दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरला? हे अद्याप कळु शकले नाही. त्यात या दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले होते. त्यामुळे आता माढ्याचा तिढा सुटलाय की कायम आहे? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही आहे.
हे वाचलं का?
दरम्यान दोनच दिवसांपुर्वी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या शिवरत्न या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. या भेटीत महाजनांनी मोहिते पाटलांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते.
माढ्याचा नेमका पेच काय?
भापजने माढा लोकसभा मतदार संघातून पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली होती. भाजपच्या या उमेदवारीला भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरातून विरोध झाला होता. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली होती.
ADVERTISEMENT
या नाराजीतूनच रामराजे निंबाळकर यांनी आपले चुलते संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार ताकद लावायला सुरूवात केली होती. तर दुसरीकडे मोहिते पाटील कुटुंबातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे त्यांच्या भावाचा मुलगा धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर
कारण गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या दोन्ही नेत्यांपासून अंतर ठेवले होते. दुसरीकडे विकासकामे करताना त्याचे संपूर्ण श्रेयही त्यांनी स्वत:च घेत होते. आणि दोन्ही नेत्यांशी त्यांनी चांगले संबंध ठेवलेच नव्हते. त्यामुळे रामराजे निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते या दोन्ही घराण्यातील लोक रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या विरोधात गेले होते.
कोण आहेत धैर्यशील मोहिते पाटील?
धैर्यशील मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भावाचे पुत्र आहेत. अनेक वर्षांपासून ते राजकारणाशी जोडले गेले आहेत. ते एक उद्योजकही आहेत. अकलूज, माळशिरस व परिसरात त्यांची मजबूत पकड आहे. तरुणांमध्येही त्यांची चांगली क्रेझ आहे. आणि लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते फार आग्रही आहेत.
2019 च्या निवडणुकीचं समीकरण काय होतं?
2019 च्या निवडणुकीपूर्वीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र त्यावेळी भाजपने मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिले होते. मोहिते पाटील यांनीही त्यांचा जोरदार प्रचार करत माळशिरस विधानसभा मतदारसंघातून त्यांना एक लाखांहून अधिक मतांची आघाडी मिळवून दिली. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर 85 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT