Narendra Modi : 'काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांच पंतप्रधान कार्यालयात...', PM मोदींची बोचरी टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 narendra modi rally in beed lok sabha mahayuti candidae pankaja munde gopinath munde bajarang sonavane ncp sharad pawar
गोपीनाथ मुंडेंकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता.
social share
google news

Pm Narendra Modi,Beed Lok Sabha Election 2024 : 'बीडचं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंशी हृदयाचे नाते राहिलेले आहे. ते नेहमी माझ्यासोबत बीड आणि मराठवाड्याच्या विकासावर चर्चा करायचे. मला त्यांची खूप आठवण येते आहे. गोपीनाथ मुंडेंकडे माझ्यापेक्षा जास्त अनुभव होता. पण मला या साथिदाराला गमवावा लागलं', असे विधान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासह मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका केली.  (narendra modi rally in beed lok sabha mahayuti candidae pankaja munde gopinath munde bajarang sonavane ncp sharad pawar) 

ADVERTISEMENT

महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत नरेंद्र मोदीस बोलत होते. तिसऱ्या टप्प्यासोबत इंडिया आघाडीची आशाही संपुष्ठात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात इंडिया आघाडी पडली, दुसऱ्या टप्प्यात संपली आणि तिसऱ्या टप्प्यात दिव्याच्या प्रकाशा इतकीच उरली होती, ती देखील विझली आहे,अशी खिल्ली मोदींनी इंडिया आघाडीची उडवली आहे. इंडिया आघाडीचा अजेंडा मिशन कॅन्सल आहे. कलम 370 मोदींनी हटवलं ते पुन्हा जम्मु काश्मीरममध्ये आणतील. किसान सन्मानची योजना बंद करून टाकतील, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : मतदान केंद्रावर तुंबळ हाणामारी, ठाकरेंच्या शिवसैनिकाची हत्या

बीडचं स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंशी हृदयाचे नाते राहिलेले आहे. मला त्यांची खूप आठवण येते आहे. मधल्या काळात मला माझ्या अनेक साथिदारांना गमवावं लागलं. गोपिनाथजी, अरूण जेटली सुषमा स्वराज्य, मनोहर पर्रिकर...त्यामुळे या साथिदारांची आठवण येतेय. आज इकडे येऊन मला गोपीनाथ मुंडे यांची आठवण येणे स्वाभाविक आहे,असे मोदी यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : अजितदादांच्या आमदाराची तुफान शिवीगाळ, बारामतीत राडाच-राडा!

इंडिया आघाडी एकच अजेंडा आहे. ते सत्तेत आले तर मिशन कॅन्सल चालवतील. कलम 370 मोदींनी हटवलं ते पुन्हा जम्मु काश्मीरममध्ये आणतील. तीन तलाक कायदा पुन्हा अंमलात आणतील. किसान सन्मानची योजना बंद करून टाकतील, मोफत रेशन योजना बंद करतील, असे मोदी यांनी सांगितले. 

महाराष्ट्र काँग्रेसची लोक 26/11 च्या दहशतवाद्यांना क्लिनचीट देतायत. कसाब सोबत आलेल्या 10 दहशतवाद्यांसोबत काँग्रेसचं नातं आहे. काँग्रेसच्या काळात दहशतवाद्यांच स्वागत पंतप्रधान कार्यालयात व्हायचं, अशी टीका मोदींनी काँग्रेसवर केली आहे. तसेच असली राष्ट्रवादी पार्टी भाजपसोबत आहे, असली शिवसेना भाजपसोबत आहे. आणि काँग्रेससोबत नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे. जिथपर्यंत सत्तेत महाविनाश आघाडी सरकार होती तिथपर्यंत काम करूच दिली नाही, असा हल्लाबोल मोदींनी महाविकास आघाडीवर केला. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT