Dattatray Bharne VIDEO: अजितदादांच्या आमदाराची तुफान शिवीगाळ, बारामतीच्या राजकारणात राडाच-राडा!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Dattatray Bharne Viral VIDEO: आमदार दत्तात्रय भरणे यांनी एका व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यावरून बारामतीतील राजकारण बरंच तापलं आहे.

social share
google news

Dattatray Bharne: इंदापूर: लोकसभा निवडणूक 2024 साठी आज (7 मे) तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच बारामती लोकसभा मतदारसंघातील एक असा व्हिडीओ समोर आला आहे की, ज्याने सध्या बरीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री आणि इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा एका व्यक्तीला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (lok sabha election 2024 dattatray bharne viral video ncp mla ajit pawar faction abused in very bad language a level of politics in baramati declined)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

या व्हिडिओमध्ये अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे हे त्यांच्याच गावातील एका व्यक्तीला सर्वांसमोर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत असल्याचं समोर आलं आहे. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्या व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे. पाहा त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे.

रोहित पवार यांचं ट्विट जसंच्या तसं...

केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा… विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत… ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही!

हे ही वाचा>> Rohit Pawar: "बारामतीत पडतोय पैशांचा पाऊस", अजित पवारांवर स्फोटक आरोप

दरम्यान, आता या व्हिडीओनंतर राष्ट्रवादी काँग्रेसवर (अजित पवार) जोरदार टीका सुरू झाली आहे. बारामतीची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यांचे कट्टर समर्थक असलेले दत्तात्रय भरणे यांच्यावर देखील मतदारसंघातील जबाबदारी आहे. अशावेळी भरणेंचा जो व्हिडीओ समोर आला आहे त्यात ते एका व्यक्तीला मतदानावरूनच शिवीगाळ करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, गावातील एका व्यक्तीला दत्तात्रय भरणे हे थेट आई-बहिणीवरून शिवीगाळ करत आहेत. तसंच 'मतदानानंतर तुला दाखवतो.. माझ्याशिवाय या गावात कोण आहे?' अशी धमकीही देत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. 

भरणे म्हणतात.. 'मी केलेली शिवीगाळ नव्हती, ती ग्रामीण भागातील...'

दरम्यान, मुंबई Tak सोबत बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, 'नाही.. गरीबांना एक जण धमकी देत होता, म्हणून हे केलं.. बाकी शिवीगाळ वैगरे काही नाही..' 

हे ही वाचा>> मतदान सुरू असतानाच सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी, नवा डाव काय?

'नाही.. गरीब पोराला एक कार्यकर्ता दम देत होता.. मी त्याला म्हटलं दम कशाला देतोस.. निवडणूक होऊन जाईल 6 वाजता.. संपून जाईल.. दम देऊ नका गोडीत घ्या सगळ्यांनी..' 

ADVERTISEMENT

'कार्यकर्ता म्हणजे त्यांची काही भांडणं चालली होती एकमेकांची.. निवडणुकीचा काही विषय नव्हता. कार्यकर्त्यांची भांडणं चालली होती ती मी सोडवली.'

'मी केलेली शिवीगाळ नव्हती, ती ग्रामीण भागातील बोलीभाषा होती. मी कधीही शिवीगाळ करत नाही. माझ्यावर केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.' असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे. 


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT