Rohit Pawar: "बारामतीत पडतोय पैशांचा पाऊस", अजित पवारांवर स्फोटक आरोप

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Rohit Pawar On Ajit Pawar : Baramati Lok Sabha : लोकसभा निवडणूक 2024 चे आज (7 मे) महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झालेली आहे. 11 मतदारसंघात होणाऱ्या या मतदानात सर्वात चर्चेचा मतदारसंघ ठरतोय तो म्हणजे बारामती. सुप्रिया सुळेंविरूद्ध सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आता ही भावकीतील लढत पाहणं रंजक ठरणार आहे. अशात मतादानाच्या आदल्या रात्री बारामतीत राडा झाला आहे. रोहित पवारांनी काका अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. (Baramati Lok Sabha Election 2024 Rohit Pawar's serious allegations against Ajit Pawar of Money was distributed for voting by PDCC bank)

रोहित पवार यांचा नेमका आरोप काय? 

रोहित पवार यांनी रात्री ट्वीट करत लिहिलं आहे की, 'पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा.' 

हेही वाचा: 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजेत', श्रीनिवास पवारांचं चॅलेंज

त्यानंतर रोहित पवार यांनी व्हिडीओही शेअर केले आहेत. 'बारामती मतदारसंघात चक्क पोलीस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस. यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडीओ शेअर करतोय. यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसता आहेत, यासाठीच पाहीजे होती का 'Y' दर्जाची सुरक्षा?' असा सवाल करत रोहित पवारांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'जनशक्ती ही शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या बाजूने तर धनशक्ती...' 

सकाळी पुन्हा माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की,  'किती पैसा वाटला तरी जनता आमच्या सोबत आहे. बारामतीत काही ठिकाणी अडीच हजारांपासून पाच हजारांपर्यंत पैसे वाटप केले जात आहे. पीडीसीसी बँक गरीबाला 5 वाजता बंद होते. परंतु पैसे वाटण्यासाठी रात्री 1-2 पर्यंत सुरू राहते. पीडीसीसी बँक, कर्मचारी आणि झेड सिक्युरिटीचा वापर केला गेला. पोलिसांच्या गाडीचा पैशासाठी वापर झाला पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले. ही लढाई जनशक्तीविरुद्ध धनशक्ती झालीय. जनशक्ती ही शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या बाजूने तर धनशक्ती ही अजित पवारांच्या बाजूने', असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

रोहित पवारांच्या आरोपांवर अजित पवार बरसले!

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रात्रभर पैसे वाटण्यात आले, बँक रात्रभर सुरू होती, असा आरोप रोहित पवारांनी केला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "हे काम निवडणूक आयोगाचे आहे. आजपर्यंत एक लोकसभा आणि सात विधानसभा निवडणुका मी लढवल्या आहेत. मी असले प्रकार कधी करत नाही. पहिल्यापासून विरोधकांतील काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते, पण मी त्याला फार महत्त्व देत नाही." 

ADVERTISEMENT

हेही वाचा: Baramati Lok Sabha : अजित पवारांची आई नेमकी कुणाच्या घरी होती?

"मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केली. तुम्ही स्वतः पीडीसीसी बँक उघडी बघितली का? तो व्हिडीओ कालचा आणि त्यावेळचाच होता का?", असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला. 

ADVERTISEMENT

"तो आरोप करतोय ना समोरचा, त्याच्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तो आरोप करतोय. त्या आरोपांना महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. त्याला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही", असे उत्तर अजित पवारांनी रोहित पवारांच्या आरोपांना दिले.


'... तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता', रोहित पवारांचं दादांना प्रत्युत्तर!

अजितदादा माझ्यावर परिणाम झाल्याचा आरोप तुम्ही केला असला तरी काही फरक पडत नाही. पण परिणाम नेमका कुणावर झाला आणि पराभवाच्या भितीने कुणाच्या पायाखालची जमीन सरकली, हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि म्हणूनच बारामती मतदारसंघात पाण्यासारखा पैसा वाहतोय.

हेही वाचा: अजितदादामुळे आई चक्क गाव सोडून पुण्याला..: श्रीनिवास पवार

तुम्ही सात वेळा निवडणूक लढवली पण असले प्रकार केले नसल्याचे सांगता पण अजितदादा त्यावेळी आजच्या इतकं ‘लक्ष्मी दर्शन’ घडवलं असतं तर राज्यात राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आणून तुम्ही आज मुख्यमंत्री असता, असं लोकं म्हणतायेत.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT