Baramati Lok Sabha: 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजेत', श्रीनिवास पवारांचं चॅलेंज
Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना त्यांच्या भावानेच आता थेट आव्हान दिलं आहे. पाहा श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

Shrinivas Pawar vs Ajit Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पवारांविरुद्ध अनेक नेते हे बारामतीत उभे राहिले मात्र कुणालाही फारसं यश मिळालं नाही. मात्र, यंदा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच सुप्रिया सुळेंविरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. ज्यामुळे थेट कुटुंबातच फूट पडली आहे. एवढंच नव्हे तर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्वत: अजित पवारांना खुलं आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. (lok sabha election 2024 baramati lok sabha ajitdada should remove his mustache now brother shrinivas pawar challenge)
दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीकरांना असं म्हटलं होतं की, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांपैकी कुणीही जर 7 मे नंतर तुमच्याकडे आलं तर मिशा काढून देईन.
अजित पवारांच्या याच विधानाचा खरपूस समाचार हा श्रीनिवास पवार यांनी घेतला आहे. मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवास पवार म्हणाले की, 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजे...'
पाहा श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले..
'मी ऐकतो की, दादा शब्दाचे पक्के आहेत.. फक्त ते जे बोललेत ते त्यांनी लक्षात ठेवावं. कारण निवडणूक झाल्यावर.. तुमच्या माहितीसाठी सांगतो रणजीत आणि राजू दादा हे इथे राहतात. त्यांचं घरच इथे आहे. त्यामुळे इतके वर्ष ते इथे काम करत आहेत. त्याने जर सगळ्यांसाठी बोललं असेल तर त्याने आताच मिशा काढल्या पाहिजेत. त्यासाठी उद्या काय होईल हे बघायची गरज नाही.'
'रोहितचं देखील घर इथे आहे.. त्याची शेती इथे आहे तो आमदार तिथला असला तरी तीन दिवस तिथे आणि तीन दिवस इथे असतो. तो जन्मानेच बारामतीकर आहे.'