Sanjay Raut : राऊतांचा व्यंगचित्रातून राज ठाकरेंवर वार, ''मोदींचे हात बळकट करा''

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

raj thackeray amit shah meet delhi sanjay raut criticize mahayuti lok sabha seat sharing maharashtra politics
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे- अमित शाह भेटीवर राज ठाकरेंच्याच व्यंगचित्र शेअर करून हल्ला चढवला आहे.
social share
google news

Sanjay Raut Criticize Raj Thackeray Amit Shah meet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. या भेटीत साधारण अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पण या दोन्ही नेत्यांमधील चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही आहे. मात्र राज-शाहा भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा आहे. असे असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे- अमित शाह भेटीवर राज ठाकरेंच्याच व्यंगचित्र शेअर करून हल्ला चढवला आहे.  (raj thackeray amit shah meet delhi sanjay raut criticize mahayuti lok sabha seat sharing maharashtra politics) 

दिल्लीतील राज ठाकरे आणि अमित शाहच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी जोरदार निषाणा साधला आहे. खरं तर राज ठाकरेंनी आतापर्यंत जाहीर सभेतून आणि व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नेहमीच टीका केली आहे. राज ठाकरेंच्या याच जुन्या व्यंगचित्राचा आधार घेऊन संजय राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा : Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा कायम! फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर रामराजेंनी मांडली स्पष्ट भूमिका

संजय राऊत यांनी राज ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र एक्सवर शेअर केले आहे. अप्रतिम! अलीकडच्या काळातील मला सगळ्यात आवडलेले व्यंगचित्र!really great...चित्रकार...सुप्रसिद्ध...होऊ दे चर्चा!!!. असं संजय राऊतांनी ट्विट करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. दरम्यान  संजय राऊत यांनी शेअर केलेलं व्यंगचित्र राज ठाकरेंनी 2019 मध्ये रेखाटलं होतं. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र 2019 सालचे आहे. या व्यंगचित्राला 'स्वतंत्रते न बघवते' असे शीर्षक राज ठाकरे यांनी दिले होते.  पंतप्रधान मोदी 'प्रजासत्ताक' फासावर लटकवत आहेत आणि मोदींचे हात बळकट कर, असे म्हणत शाह त्यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचे व्यंगचित्रामध्ये दाखवण्यात आले आहे.

हे ही वाचा : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर

    follow whatsapp

    ADVERTISEMENT