Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा कायम! फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर रामराजेंनी मांडली स्पष्ट भूमिका
Ramraje Nimbalkar Viral Letter : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा रामराजेंचा विरोध मावळला असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेनंतर आता रामराजेंनी सोशल मीडियावर एक पत्रक शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT
Ramraje Nimbalkar Viral Letter : माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी आज देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा रामराजेंचा विरोध मावळला असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चेनंतर आता रामराजेंनी सोशल मीडियावर एक पत्रक शेअर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे माढ्याचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. (madha loksabha seat ramraje nimbalkar viral letter devendra fadnavis sagar bunglow meeting rahjitsingh naik nimbalkar candiate dhairyshil mohite patil vijay singh mohite patil)
ADVERTISEMENT
माढ्यासंदर्भात तिढा सोडवण्यासाठी आज देवेंद्र फडणवीसांनी सांगर बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला रामराजे निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील,जयकुमार गोरे असे अनेक नेते उपस्थित होते. या दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी आज रामराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील या दोन्ही नेत्यांसोबत तब्बल दोन तास चर्चा केली. या चर्चेत फडणवीसांनी दोन्ही नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरला? हे अद्याप कळु शकले नाही. त्यात दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले होते.
हे ही वाचा : शरद पवारांना सुप्रीम कोर्टात झटका अन् दिलासाही! काय दिले आदेश?
मात्र तरी देखील या बैठकीनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला असणारा रामराजेंचा विरोध मावळला, अशी चर्चा सुरु झाली होती. रामराजे निंबाळकरांनी एक पाऊल मागे घेतल्याचीही चर्चा होती. त्यामुळे माढ्याचा तिढा सुटल्याची चर्चा सुरू झाली होती.
हे वाचलं का?
मात्र या चर्चेनंतर रामराजेंनी व्हाट्सअॅप स्टेटसवर एक पत्रक शेअर करून सागर बंगल्यावरील बैठकीचा तपशील सांगितला आणि त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी माढा लोकसभा संदर्भातील बैठकीत महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली. परंतू मी माझ्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी व मतदार संघातील समविचारी पक्षांशी चर्चा करून निर्णय देईन असे सांगितले. याव्यतिरीक्त कोणतीही चर्चा झाली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका,,असे आवाहन रामराजेंनी कार्यकर्त्यांना केला आहे.
हे ही वाचा : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर
दरम्यान रामराजेंच्या या भूमिकेनंतर माढा लोकसभा मतदार संघाचा तिढा कायम असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच आता दोन दिवसानंतर रामराजे काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT