Lok sabha Election 2024 : ''मी चंद्रकांत खैरेंच काम करणार नाही...'', अंबादास दानवेंचं खळबळजनक विधान

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

shiv sena udhhav thackeray declare 17 candidate chandrakant khaire sambhaji nagar lok sabha constituency ambadas danve reaction
'मी खैरे यांचे नाही तर पक्षाचं काम करणार आहे', असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.
social share
google news

Ambadas Danve vs Chandrakant Khaire, Sambhaji Nagar Lok sabha : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आज 17 लोकसभेच्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघातून खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच जागेवर शिवसेनेचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दावा केला होता. मात्र आता खैरेंना पक्षातून उमेदवारी मिळाल्याने अंबादास दानवे नाराज आहेत. त्यामुळे 'मी खैरे यांचे नाही तर पक्षाचं काम करणार आहे', असे दानवे यांनी स्पष्ट केले आहे.  (shiv sena udhhav thackeray declare 17 candidate chandrakant khaire sambhaji nagar lok sabha constituency ambadas danve reaction)  
 
सर्वांची मते जाणून घेऊन ही उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. दिल्ली गाठण्यासाठी ही प्रभावी यादी आहे. या यादीतले जास्तीत जास्त उमेदवार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात दिल्लीत पोहोचतील. त्यामुळे पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती जबाबदारी प्रभावीपणे पार पडणार आहे. 'मी खैरे यांचे नाही तर पक्षाचं काम करणार आहे', असे दानवे यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : शिवसेना खासदाराचं तिकीट कापलं; शिंदे 'इथेही' उमेदवार बदलणार?

मी इच्छुक होतो. 2014, 2019 आणि 2024 ला..इच्छा असणे यात वावगं असायच कारण नाही. ही इच्छा असून सुद्धा विधान परीषदेचे सदस्य, विरोधी पक्षनेते ही जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी दिली. इच्छा असणे हा शिवसैनिकाचा अधिकार आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घ्यायचा अधिकार त्यांना आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले. 

दरम्यान खैरेंना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होताच अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवलं आहे. या स्टेटसमथ्ये ''ये साजिश का दौर है...और हम कोशिशो मे उलझे हुए है...', असे स्टेटसमध्ये दानवेंनी म्हटले आहे. त्यामुळे खैरेंच्या उमेदवारीने दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : वंचित बहुजन आघाडीची यादी पाहिली का.. कोणाला बसणार फटका?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT