Lok Sabha Election 2024: वंचित बहुजन आघाडीची यादी पाहिली का.. कोणाला बसणार फटका?

मुंबई तक

VBA Candidates: महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर कोणतीही तडजोड न झाल्याने अखेर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची साथ सोडत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

VBA Candidates: महाविकास आघाडीसोबत जागा वाटपावर कोणतीही तडजोड न झाल्याने अखेर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची साथ सोडत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर केले आहेत.

social share
google news

VBA Candidates list: अकोला: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत थेट वंचितच्या उमेदवारांची यादीच जाहीर केली. पण यावेळी त्यांनी एक दुसरी खेळी खेळली आहे. महाविकास आघाडी सोबत नसल्याने प्रकाश आंबेडकरांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सोबत घेतलं आहे. तर याशिवाय काँग्रेसच्या काही जागांवर उमेदवार न देण्याची भूमिकाही आंबेडकरांनी घेतली आहे. (lok sabha election 2024 first list of vanchit bahujan aghadi candidates announced prakash ambedkar himself will contest election from akola) 

वंचित बहुजन आघाडीची यादी जाहीर, पाहा कोण आहेत उमेदवार

  1. अकोला - प्रकाश आंबेडकर
  2. भंडारा गोंदिया - संजय गजानन केवट
  3. गडचिरोली चिमूर - हितेश पांडुरंग मडावी
  4. चंद्रपूर - राजेश वारलुजी बेरे
  5. बुलढाणा - वसंत राजाराम मगर
  6. अमरावती - कु. प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण
  7. वर्धा - प्रा. राजेंद्र साळुंके
  8. यवतमाळ वाशिम - खेमसिंग प्रतापराव पवार

*नागपूर - काँग्रेसला पाठिंबा*
*सांगलीतून ओबीसी बहुनज पार्टीचे प्रकाश शेंडगे उभे राहिल्यास त्यांना पाठिंबा.*

    follow whatsapp