Lok Sabha elections 2024 : शिवसेना खासदाराचं तिकीट कापलं; शिंदे 'इथेही' उमेदवार बदलणार?

मुंबई तक

Shiv Sena Krupal Tumane Latest News : एकनाथ शिंदे यांनी कृपाल तुमाने यांचे तिकीट कापत राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता आणखी खासदारांची तिकिटे कापली जाणार असल्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

राजू पारवे यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.
रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी राजू पारवे यांना उमेदवारी दिली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ शिंदेंनी बदलला उमेदवार

point

तीन ते चार लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदारांना डच्चू मिळणार

point

भाजपकडून उमेदवार बदलण्याची सूचना

Shiv Sena Lok Sabha list : गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात दबक्या आवाजात एक चर्चा होती, ती आता खरी ठरताना दिसत आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंना काही मतदारसंघातील उमेदवार बदलण्यास सांगितले आहे. यातील पहिली विकेट पडली आहे. एकनाथ शिंदेंनी विद्ममान खासदाराचं तिकीट कापत काँग्रेसमधून आयात नेत्याला उमेदवारी दिली आहे. तिकीट कापण्यात आलेल्या विद्ममान खासदाराचे नाव आहे कृपाल तुमाने. (shiv sena led by eknath shinde announced raju parve as lok sabha candidate instead of krupal tumane from ramtek)

महायुतीतील जागावाटपाच्या बैठका सुरू झाल्यानंतर सुत्रांनी अशी माहिती दिलेली की, शिवसेनेच्या काही मतदारसंघात खासदारांच्या विरोधी वातावरण आहे. पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली होती. त्यामुळे भाजपकडून एकनाथ शिंदेंना अशा मतदारसंघातील उमेदवार बदलण्यास सांगण्यात आले होते. यातील एक मतदारसंघ होता रामटेक, जिथे शिंदेंनी विद्ममान खासदार कृपाल तुमानेंना बाजूला काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्याला उमदेवारी दिली. 

राजू पारवेंच्या नावाची घोषणा, उमेदवारी अर्जही दाखल

कृपाल तुमाने यांचे तिकीट कापले जाणार, हे खात्रीने सांगितले जात होते. त्यावर शिंदेंनी शिक्कामोर्तब केले. कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आल्याची चर्चा होऊ नये म्हणून शिवसेनेकडून त्यांच्या नाव जाहीर न करता थेट उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्याला एकनाथ शिंदे आणि महायुतीचे इतर उमेदवार उपस्थित होते.

हेही वाचा >> जरांगेंसोबत आंबेडकरांचा काय ठरला प्लॅन ; 'मविआ'चा होणार गेम?  

याबद्दल शिंदे म्हणाले, "रामटेकचे आमचे राजू पारवे हे देखील प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या भूमीतून उभे आहेत. त्यांनी देखील सांगितलेलं आहे की काँग्रेसमध्ये काही राम राहिलेला नाही. विद्यमान आमदार असताना त्यांनी महायुतीची उमेदवारी घेतलेली आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या पाठिंशी आमचे खासदार कृपाल तुमाने हे भक्कमपणे उभे आहेत. तुमाने यांनाही मी मोठी जबाबदारी देणार आहे. तुमाने यांच्या दहा वर्षातील कामाची पोचपावती या निवडणुकीत मिळेल", असे एकनाथ शिंदे राजू पारवे यांची उमेदवारी जाहीर करताना म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp