Prakash Ambedkar : जरांगेंसोबत आंबेडकरांचा काय ठरला प्लॅन ; 'मविआ'चा होणार गेम?
Prakash Ambedkar Manoj Jarange new alliance : प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्रितपणे लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रकाश आंबेडकर-मनोज जरांगे यांच्यात काय झाली चर्चा?
महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रकरणावर पडदा
लोकसभा निवडणुकीत वंचित स्वबळावर लढणार
Prakash Ambedkar Manoj Jarange patil Lok Sabha elections : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली आहे. राज्यात नवी आघाडी स्थापन करणार आहोत, असेही आंबेडकर यांनी सांगितल्याने महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान निर्माण झाले आहे. आंबेडकर-जरांगेमध्ये चर्चा काय झाली आणि निवडणुकीला कसे सामोरे जाणार, हेच जाणून घेऊयात...
वंचित बहुजन आघाडीची भूमिका लोकसभा निवडणुकीत कुणाला जास्त फटका देईल, हे जाणून घेण्याआधी आंबेडकर काय म्हणाले ते बघा...
प्रकाश आंबेडकर म्हणाले, "काल महाराष्ट्र राज्य समितीची बैठक झाली. त्या बैठकीत काही निर्णय झाले आहेत, ज्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे, पण त्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेवेळी साई कामत आणि किसन चव्हाण हे दोघेही माझ्यासोबत होते."
जरांगेंसोबत आंबेडकरांची काय झाली चर्चा?
"आमची सविस्तर चर्चा झाली. त्यात असं ठरलं की, ओबीसी समुहाला उमेदवारी दिली जात नव्हती, त्यांच्यासोबत जी आघाडी होणार आहे. त्यात ओबीसींना उमेदवारी दिली जाईल. दुसरा मुद्दा "भाजपने मुस्लिमांचं विलगीकरण सुरू केले आहे. त्याला थांबवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत मुस्लिम उमेदवार उतरवायचे. तिसरा मुद्दा जैन समाजाचा उमेदवारही जिंकून आणायचा. महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची, वंचितांची आणि गरीब मराठा, मुस्लीम इतरांची ही नवीन वाटचाल असं आम्ही मानतोय. या वाटचालीला समूह पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आम्ही धरतोय", असेही आंबेडकरांनी सांगितले.










