Rahul Gandhi Assets : राहुल गांधींकडे फक्त 55 हजार रोख, किती आहे एकूण संपत्ती?
Wayanad Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी बुधवारी (03 मार्च) केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी, सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
Wayanad Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी बुधवारी (03 मार्च) केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी, सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी उमेदवारी देताना दिलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्या 55,000 रुपये रोख रक्कम आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते. (Wayanad Lok Sabha Election 2024 affidavit of Rahul Gandhi's Assets know about the details)
ADVERTISEMENT
राहुल गांधींची संपत्ती गेल्या 5 वर्षांमध्ये जवळपास 5 कोटींनी वाढली आहे. उमेदवारी अर्जाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे. मात्र गेल्या 2022-23 या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न घटले आहे. चला तर मग मुंबई तकच्या या विशेष बातमीतून आज आपण राहुल गांधींच्या एकूण संपत्तीविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
राहुल गांधींची शेअर बाजारात मोठी गुंतवणूक
राहुल गांधी यांनी त्यांच्या नावावर बँकेत 26.25 लाख रुपये ठेव असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर, शेअर बाजारात त्यांची एकूण गुंतवणूक 4.33 कोटी रुपये आहे. राहुल गांधी यांची म्युच्युअल फंडातही 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. तर सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक 15.2 लाख रुपयांची आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे 4.2 लाख रुपयांचे दागिनेही आहेत.
हे वाचलं का?
याशिवाय राहुल गांधींच्या नावावर एनएसएस, पोस्टल सेव्हिंग आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.
माहितीनुसार, राहुल गांधी यांच्याकडे एकूण 9,24,59,264 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर, स्थावर मालमत्ता एकूण जवळपास 11,14,02,598 रुपयांची आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये इतकी आहे. मात्र, राहुल गांधी यांच्यावरही सुमारे 49,79,184 रुपयांचे दायित्व (भाडेकरूंकडून घेतलेले डिपॉझिट) आहे. राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये होती.
ADVERTISEMENT
2019 मध्ये राहुल गांधींची एकूण किती होती संपत्ती?
2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते, त्याचवेळी त्यांच्यावर 72 लाख रुपयांचे कर्जही होते. गेल्या 5 वर्षात राहुल गांधी यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटींची वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
उल्लेखनीय आहे की ते दुसऱ्यांदा वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2019 मध्ये त्यांनी येथे मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. नामांकनापूर्वी त्यांनी वायनाडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियांका गांधीही दिसल्या होत्या.
तुमची खासदारकी मिळणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे राहुल गांधी यांनी परिसरातील जनतेला सांगितले. वायनाड मतदारसंघात राहुल विरुद्ध I.N.D.I.A. सीपीआयच्या (Communist Party of India) ॲनी राजा निवडणूक लढवत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT