अमिताभ बच्चन पुन्हा विचारणार प्रश्न; लवकरच येणार केबीसीचा 13वा सिझन - Mumbai Tak - amitabh bachchans kaun banega crorepati 13 registrations begin on may 10 - MumbaiTAK
मनोरंजन

अमिताभ बच्चन पुन्हा विचारणार प्रश्न; लवकरच येणार केबीसीचा 13वा सिझन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका तसंच सिनेमांच्या शूटींमध्ये फार अडथळा येतोय. काही मालिकांचं शूटींग बंद आहे. अशातच प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीचा नवी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौन बनेगा करोडपती शोच्या रजिस्ट्रेशनची तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे. सोनी चॅनेलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यांची माहिती दिली आहे. हे केबीसीचं […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका तसंच सिनेमांच्या शूटींमध्ये फार अडथळा येतोय. काही मालिकांचं शूटींग बंद आहे. अशातच प्रेक्षकांसाठी एक चांगली बातमी आहे. लवकरच अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीचा नवी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कौन बनेगा करोडपती शोच्या रजिस्ट्रेशनची तारखेची देखील घोषणा करण्यात आली आहे.

सोनी चॅनेलने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यांची माहिती दिली आहे. हे केबीसीचं 13वं सिझन आहे. इन्स्टाग्रामवर नमूद केल्यानुसार, “मिस्टर अमिताभ बच्चन पुन्हा एकदा प्रश्न घेऊन येत आहेत. तर तुमचा फोन उचला कारण 10 मे पासून केबीसीच्या तेराव्या सिझनचं रजिस्ट्रेशन सुरु होतंय.” कोरोनाच्या या कठीण काळात कौन बनेगा करोडपती पुन्हा एकदा सुरु होणार असल्याचे प्रेक्षक देखील खूश आहेत.

केबीसीचा 12 सिझन गेल्या वर्षी 28 डिसेंबरला ऑन एअर करण्यात आला होता. भोपाळच्या आरती जगताप या शोच्या पहिल्या कंटेस्टेंट होत्या. तर 12 व्या सिझनच्या नजिया नजीम 1 करोड जिंकणाऱ्या पहिल्या कंटेस्टेंट होत्या. 22 जानेवारी रोजी सिझनचा शेवटचा एपिसोड झाला होता.

नुकतंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या कठीण परिस्थितीत जे लोकं कोरोनाशी लढत आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचसोबत अमिताभ यांनी सुरक्षित राहून नियमांचं पालन करण्यास सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × five =

Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार