आरारारारा! भाऊजीचं मेव्हणीसोबत जडलं प्रेम..सासऱ्याला कळलं, रागाच्या भरात जावयाचं मुंडकच उडवलं
Shocking Murder Case : आंध्रप्रदेशच्या सत्या साई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील धर्मावरम परिसरात एका सासऱ्याने त्याच्या जावयाची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सासऱ्याने जावयाच्या हत्येचा कट रचला

जावयाचं मेव्हणीसोबत सुरु होतं अफेअर

त्या घरात नेमकं घडलं काय?
Shocking Murder Case : आंध्रप्रदेशच्या सत्या साई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. येथील धर्मावरम परिसरात एका सासऱ्याने त्याच्या जावयाची निर्घृण हत्या केली. आरोपी सासऱ्याने जावयाचं डोकं धडापासून वेगळं केलं. विश्वनाथ असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर वेंकटारामणप्पा असं आरोपी सासऱ्याचं नाव आहे. जावयाची हत्या करण्यासाठी सासऱ्याने त्याच्या एका मित्राचीही मदत घेतली. पोलिसांनी याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे.
याप्रकरणी धर्मावरम विभागाचे डीएसपी हेमंत यांनी म्हटलं की, वेंकटारामणप्पाने 20 वर्षांपूर्वी त्याची मोठी मुलगी श्यामलाचं लग्न विश्वनाथसोबत केलं होतं. लग्नाच्या काही वर्षानंतर विश्वनाथचं त्याच्या मेव्हणीसोबत प्रेमसंबंध सुरु झाले. एवढंच नाही, तर विश्वनाथने त्याच्या मेव्हणीसोबत अनैतिक संबंधही सुरू केले.
या सर्व गोष्टींमुळे विश्वनाथचं त्याच्या पत्नीसोबत वादविवाद होऊ लागले. यामुळे विश्वनाथ आणि त्याच्या पत्नीत दुरावा निर्माण झाला. त्यानंतर दोघेही वेगवेगळे राहू लागले. आरोपी वेंकटारामणप्पाचंही त्याच्या पत्नीसोबत भांडण होत होतं. त्यांच्यातही दुरावा निर्माण झाला. त्यानंतर विश्वानाथने त्याच्या पत्नीला सोडलं. तो सासू आणि मेव्हणीसोबत वेगळ्या ठिकाणी राहू लागला.
हे ही वाचा >> मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
सासऱ्याने जावयाच्या हत्येचा कट रचला
यामुळे सासरा त्याच्या जावयावर खूप नाराज झाला. सासऱ्याने जावयाच्या हत्येचा कट रचला. डीएसपी हेमंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथने काही वेळापूर्वी धर्मावरममध्ये सासूच्या नावावर असलेली जमिन विकण्याचा प्रयत्न केला. यामुळे वेंकटरमणप्पाचा राग वाढला. त्यानंतर सासऱ्याने जावयाच्या खुनाचा कट रचला.
वेंकटारामणप्पाने त्याचा मित्र काटामय्याची मदत घेतली. काटमय्याने 3 जुलै रोजी विश्वनाथला जमिनीचे 50000 रुपये देण्याचं सांगितलं आणि शहाराच्या बाहेर बोलावलं. त्यानंतर वेंकटारकामणप्पाने काटामय्या आणि तीन लोकांच्या मदतीने त्याच्या जावयाची निर्घण हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी सर्व आरोपींना अटक केली आहे.