मुंबईची खबर: बीकेसी-कुर्ला पॉड टॅक्सी प्रोजेक्टमध्ये अडथळा... MMRDA ची ‘ही’ मागणी

मुंबई तक

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील पॉड टॅक्सी प्रकल्प पुढे नेत वन मंजुरीसाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.

ADVERTISEMENT

बीकेसी-कुर्ला पॉड टॅक्सी प्रोजेक्टमध्ये अडथळा...
बीकेसी-कुर्ला पॉड टॅक्सी प्रोजेक्टमध्ये अडथळा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील पॉट टॅक्सी प्रोजेक्टमध्ये पर्यावरणीय अडथळा

point

MMRDA ची वन विभागाकडे मागणी...

Mumbai News: मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मधील पॉड टॅक्सी प्रकल्पाला पर्यावरणीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या परिसरातील पॉड टॅक्सी प्रकल्पावर पुनर्विचार करण्याची मागणी अनेक परिवहन तज्ञ करत आहेत. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) हा प्रकल्प पुढे नेत वन मंजुरीसाठी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.


 

मँग्रोव्ह वनातून जाणारा मार्ग  

 

मिड-डेच्या वृत्तानुसार, पॉड टॅक्सी मार्ग खारफुटीच्या जंगलातून म्हणजेच मँग्रोव्ह वनांतून जातो, त्यामुळे कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी वन मंत्रालयाकडून मंजुरी घेणे अनिवार्य आहे.


 

एक्सटर्नल टीमची निवड...  

 

दरम्यान, पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या टेक्निकल तसेच डिझायनिंग बाबींवर विचार आणि  देखरेख करण्यासाठी स्वतंत्र इंजिनीअरिंग म्हणजेच अभियांत्रिकी फर्मची नियुक्ती करण्याचा निर्णय घेऊन एमएमआरडीएने एक मोठे पाऊल उचललं आहे. इतर पायाभूत सुविधा उपक्रमांप्रमाणे, या प्रकल्पात खास तज्ज्ञांची एक्सटर्नल म्हणजेच बाह्य टीम असेल.


 

MMRDA च्या अधिकाऱ्याची माहिती 

 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार MMRDA च्या एका अधिकाऱ्याच्या मते, ‘पॉड टॅक्सीमध्ये आधुनिक पद्धतीचे ऑटोमेशन आणि बॅटरीवर चालणाऱ्या सिस्टिमचा समावेश असल्याने, टेक्निकल बाबी विचारात घेऊन अभियांत्रिकी म्हणजेच इंजिनीअर्सची एक्सटर्नल टीम आणत आहोत’.

 

हे ही वाचा:  पूजा यादवने पोलीस स्टेशन परिसरातच स्वत:ला संपवलं! प्रियकराच्या नव्या लव्ह स्टोरीमुळे उडाली खळबळ, काय घडलं?


 

18 अभियंत्यांची एक टीम 

 

सुमारे 1,100 कोटी रुपये असा अपेक्षिक खर्च असलेला पॉड टॅक्सी प्रकल्प 2024 मध्ये साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आला. स्पेशल पर्पज व्हेकिकल (एसपीव्ही) नावाच्या बीकेसी कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड द्वारे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी पार पाडली जाईल. तसेच, वाहतूक सिस्टिम आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा अनुभव असलेल्या 18 अभियंत्यांची एक टीम तैनात केली जाईल.


 

आधुनिक पर्याय... 

 

कुर्ला, वांद्रे पूर्व आणि बीकेसी यांना जोडणाऱ्या या पट्ट्यातील शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. पॉड टॅक्सी नेटवर्कमध्ये 38 स्थानके असतील. यामध्ये दर 15 ते 30 सेकंदांनी पॉड्स येतील. दररोज ऑफिसमध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांसाठी हा आधुनिक पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

हे ही वाचा: पुणे तिथे काय उणे! तरुणाचा मित्राकडून अनोखा वाढदिवस साजरा, हवेत दोन राउंड फायरिंग, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?


 

ही भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था मुंबई महानगर प्रदेशात MMRDAच्या 1.2 लाख कोटी रुपयांच्या मोठ्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा एक भाग आहे.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp