पूजा यादवने पोलीस स्टेशन परिसरातच स्वत:ला संपवलं! प्रियकराच्या नव्या लव्ह स्टोरीमुळे उडाली खळबळ, काय घडलं?
Shocking love Story Viral : वाराणसीत एका प्रेम कहाणीचा दु:खद शेवट झाला आहे. पूजा यादव नावाच्या विवाहित महिलेनं पोलीस स्टेशन परिसरात विष प्राशन केलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT

Shocking love Story Viral : वाराणसीत एका प्रेम कहाणीचा दु:खद शेवट झाला आहे. पूजा यादव नावाच्या विवाहित महिलेनं पोलीस स्टेशन परिसरात विष प्राशन केलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. 28 वर्षीय पूजा यादवला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेला तिचा प्रियकर रोशन यादवसह त्याची मैत्रिण अंजना यादवला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. या दोघांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजाचं लग्न जवळपास 6 वर्षांपूर्वी रामदयाल यादवसोबत झालं होतं. यादव नाशिकमध्ये फळबागेत काम करायचा. गेल्या दोन वर्षांपासून तिचं शेजारच्या रोशन यादवशी जवळीक वाढलं होतं. यामुळे रोशनची मैत्रिण अंजना यादव नाराज झाली होती. पूजाचा भाऊ गोलू यादवने म्हटलं की, रोशनने तिला फोन करून पूजाने विष प्राशन केल्याची माहिती दिली.
हे ही वाचा >> मोठी बातमी! जयंत पाटील यांचा शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, 'हा' नेता पदभार सांभाळणार
पूजाला याप्रकरणी समज देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. कारण रोशनच्या दुसऱ्या प्रेयसीने पूजाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पूजाला दोन मुलंही आहेत. पूजाचा भाऊ मनोज यादवने पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केलीय. पूजाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याने केला आहे.
कुणीतरी पूजाला विष दिलं असेल, असाही संशय त्याने व्यक्त केला आहे.डीसीपी काशी गौरव बंसवाल यांनी म्हटलंय की, रोशन यादवच्या विरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावण्यात आलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाने पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या झाडाजवळ काहीतरी पदार्थ खाल्ला.
हे ही वाचा >> “त्यालाच मी आवडायचे, पत्नी म्हणायचा, टॅटूसुद्धा...” मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचे पुरावे!
ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. डीसीपी बंसवाल यांनी असंही म्हटलंय की, रोशन यादवचे अनेक महिलांसोबत संबंध होते. पूजाही रोशनबाबत नाराज होती. या नाराजीमुळेच तिने विष प्राशन केलं. दरम्यान, पोलिसांनी पूजाच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केलं आहे. तसच सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे.