“त्यालाच मी आवडायचे, पत्नी म्हणायचा, टॅटूसुद्धा...” मुंबईतील विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचे पुरावे!
शाळेतील एका महिला शिक्षिकेवर 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात नवा खुलासा करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थीच शिक्षिकेवर प्रेम करत असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा शिक्षिकेवर आरोप

प्रकरणात नवा ट्विस्ट

शिक्षिकेने पीडित विद्यार्थ्याविरोधात सादर केले पुरावे
Mumbai Crime: मुंबईतल्या शाळेतील एका महिला शिक्षिकेवर 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला अटक करण्यात आली असून तिने आता कोर्टात जामिन अर्जाची याचिका केली आहे. यासंदर्भात नवा खुलासा करण्यात आला आहे.
प्रकरणातील नवा ट्विस्ट
यावेळी कोर्टात पीडित विद्यार्थीच शिक्षिकेवर प्रेम करत असल्याचे पुरावे सादर करण्यात आले आहेत. आरोपी शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याने पाठवलेले चॅटिंग आणि प्रेमपत्र पुरावे म्हणून सादर केले आहेत. शिक्षिकेने जामिन मिळवण्यासाठी कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांमुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
पत्नी म्हणायचा....
विद्यार्थ्यासोबत तात्पुरत्या प्रेमसंबंधात असून त्याचंच आपल्यावर मनापासून प्रेम असल्याचं शिक्षिकेने अर्जात सांगितलं. जामिन मिळवण्यासाठी आरोपी शिक्षिकेने विद्यार्थ्याने केलेले मॅसेजेस, प्रेमपत्र, गिफ्ट्स आणि चॅटिंग कोर्टात दाखवली. तो अल्पवयीन विद्यार्थी आपल्याला किकी, पुकी म्हणून बोलवत असल्याचं शिक्षिकेने सांगितलं. इतकेच नव्हे तर पीडित विद्यार्थी आपल्याला पत्नी म्हणत असल्याचं देखील तिने सांगितलं.
हे ही वाचा: पुणे तिथे काय उणे! तरुणाचा मित्राकडून अनोखा वाढदिवस साजरा, हवेत दोन राउंड फायरिंग, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
टॅटूदेखील गोंदवला
किकी आणि पुकी म्हणून टोपणनाव दिले असून ते नाव देखील त्याने आपल्या शरीरावर गोंदवलं असल्याचं त्या आरोपी शिक्षिकेने सांगितलं. शिक्षिकेने या अल्पवयीन विद्यार्थ्याला वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिच्यावर आहे. आरोपी शिक्षिका सध्या अटकेत असून तिच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन विद्यार्थ्याच्या विरोधात पुरावे
अल्पवयीन विद्यार्थी आणि आपल्यातील संबंध परस्पर असल्याचा दावा आरोपी शिक्षिकेने केला आहे. तिने सादर केलेल्या अर्जात पीडित विद्यार्थ्याने तिला लिहिलेली प्रेमपत्रे, ईमेल, व्हॉट्सअप चॅट्स आणि भेटवस्तूंचे फोटो आहेत.
हे ही वाचा: “मला कुटुंबापासून दूर जायचंय...” राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
आरोपी शिक्षिकेने केला दावा
अल्पवयीन विद्यार्थीच आपल्या प्रेमात असल्याचे पुरावे दाखवताना मुलाच्या आईवडिलांनी त्याचा मोबाईल आणि लॅपटॉप काढून घेतल्याचं आरोपी शिक्षिकेने सांगितलं. याचा अर्थ मुलाच्या पालकांना या सगळ्याची जाणीव असल्याचा दावा तिने केला. त्यानंतर बचाव पक्षाने केलेल्या युक्तीवादावरून पुरावे म्हणून सादर केलेले ईमेल्समध्ये परिक्वता आणि जागरुकता निदर्शनास येत असून हे कृत्य पीडित मुलाने केले नसावे. तक्रार केलेल्या मुलापासून दूर जाण्यासाठी तिने वर्षाच्या शेवटी शाळा सोडली असल्याचं देखील आरोपी शिक्षिकेनं सांगितलं. त्यानंतर तिने कंटेंट रायटर म्हणून काम केलं.