MC Stanच्या शोमध्ये करणी सेनेचा गोंधळ; शोमधून पळ काढावा लागला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

MC Stan’s show Indore : (Bigg Boss) बिग बॉस विजेता आणि रॅपर एमसी स्टॅन चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. एमसी स्टॅनबाबत चाहत्यांची क्रेझ सातव्या गगनाला भिडलेली असते. एमसी स्टॅन बिग बॉसपासून सतत शो करत आहे. त्याची मागणी खूप वाढली आहे. पण आता एमसी स्टॅनबद्दल एक बातमी समोर येत आहे. (Indore) इंदूरमधील रॅपरच्या शोला करणी सेनेने विरोध केला होता, त्यानंतर त्याला कार्यक्रम सोडावा लागला होता.(MC Stan’s show shut down by Karni Sena; The police had to lathicharge)

एमसी स्टॅनच्या शोमध्ये गोंधळ

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा कॉन्सर्ट होणार होता, ज्यामध्ये रॅपरला आधीच सूचना देण्यात आली होती की, जर त्याने कोणताही आक्षेपार्ह शब्द वापरला तर करणी सेना त्याला विरोध करेल. मात्र गायक-रॅपर एमसी स्टेन याला ते मान्य नव्हते आणि त्याने रात्री उशिरा शोमध्ये गाणे म्हणताच करणी सेनेचे लोक मंचावर पोहोचले.

गोंधळामुळे एमसी स्टॅनला शोमधून पळ काढावा लागला. गोंधळ इतका वाढला की पोलिसांना हलका लाठीचार्ज करावा लागला. करणी सेनेने विरोध केल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाला कॉन्सर्ट मागे घ्यावा लागला. शेकडो जनता रस्त्यावर जमली होती, तिथे करणी सेनेकडून सातत्याने निषेध करण्यात येत होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Bigg Boss 16 : पुणेकर MC Stan कसा घडला? ‘अस्तगफिरुल्ला’ने दिली कलाटणी

एमसी स्टॅनला धमक्या

असेही सांगण्यात येत आहे की करणी सेनेचा कार्यकर्ता दिग्विजय सोळंकी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री उशिरा लासुदिया पोलीस स्टेशन हद्दीतील जॉर्डन हॉटेलमध्ये पोहचला होता, जिथे त्याने एमसी स्टॅनचा निषेध केला. आंदोलनानंतर हॉटेलमध्ये झालेला गोंधळ पाहून पोलिस ठाण्याच्या पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले.

ADVERTISEMENT

एवढेच नाही तर करणी सेनेने स्टेजवर चढून कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांना असे आक्षेपार्ह आणि असभ्य स्टेज शो करणाऱ्यांना करणी सेना सातत्याने विरोध करत असल्याची सूचना केली. एमसी स्टॅन जिथे सापडेल तिथे मारहाण केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.

ADVERTISEMENT

MC Stan च्या विजयानंतर शिव आणि प्रियंकाचे चाहते बिग बॉसवर भडकले

करणी सेनेचा इशारा

करणी सेनेचे कार्यकर्ता दिग्विजय सोलंकी म्हणाला, आम्ही आमच्या संस्कृतीच्या विरोधात काहीही होऊ देणार नाही. यापूर्वीही आम्ही नकार दिला होता. आम्ही आधीच सांगितले होते की, इंदूरमध्ये शो केल्यास शिवीगाळ चालणार नाही. पण त्याला ते मान्य नव्हते. आम्ही विरोध केला आणि त्याला शो सोडावा लागला. आपण आपल्या मुलांना कोणती संस्कृती देत ​​आहोत, असं तो म्हणाला.

एमसी स्टॅन कोण आहे?

एमसी स्टॅन एक रॅपर आणि गायक आहे. एमसी स्टॅनचे खरे नाव अल्ताफ शेख आहे. तो पुण्याचा रहिवासी आहे. त्याचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. एमसी स्टॅन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची गाणी येताच ट्रेंड करायला लागतात. बिग बॉस शोमधून एमसी स्टॅनला विशेष ओळख मिळाली आहे. शोमधील त्याचा प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. पण चाहत्यांनी त्याला अपार प्रेम दिले आणि त्याला बिग बॉसचा विजेता बनवला. आता एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमध्ये झालेल्या गदारोळामुळे त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत.

MC Stan : ‘बस्ती का हस्ती’ एका Reelसाठी घेतो लाखो रूपये, तर स्टोरीसाठी किती?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT