साहित्य रसिकांचा ‘विश्वास’घात!; नाशिक साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी विश्वास पाटलांच्या निवडीवर घेतला जातोय आक्षेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवसांत अचानक ‘अतिकार्यतत्पर’ होऊन शेकडो फाइली निकालात काढणारे व त्यामुळे भ्रष्टाचारासारख्या गंभीर आरोपांच्या फेऱ्यात अडकलेले विश्वास पाटील यांची नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी निवड करण्यात आल्याने साहित्य क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकतीच आयोजकांकडून विश्वास पाटील यांच्या नावाची घोषणा झाली. यानंतर साहित्य क्षेत्रातून त्यांच्या निवडीवर नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत विश्वास पाटील यांची केवळ शासकीय कारकिर्दीच नाही तर वाड्:मयीन प्रवासही वादग्रस्त राहिला आहे. ‘लस्ट फॉर लालबाग’चे कथानक माझ्याच लिखाणावरून चोरलेले आहे, असा गंभीर आरोप खुद्द त्यांचे भाऊ सुरेश पाटील यांनी केला होता. अशी वादग्रस्त पाश्र्वभूमी असतानाही संमेलनाचा उद्घाटक म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याने साहित्य क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्घाटन समारोपाची नावे आयोजक व राष्ट्रवादी काँग्रसची मंडळीच ठरवताहेत, याबाबतचे निर्णय घेताना महामंडळाला अंधारात ठेवेल जातेय, अशीही माहिती आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इतर भाषांशी संबंध जोपासणे हे महामंडळाच्या घटनेत नमूद एक कर्तव्य असल्याने याआधी अनेक संमेलनात गिरीश कर्नाड, भैरप्पा, हिंदीतील प्रसिद्ध नाव विष्णू खरे, रघुवीर चौधरी, बंगाली साहित्यिक सुनील गंगोपध्याय, शितांशू यशशचंद्र यासारख्या नामांकित व ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरविलेल्या मान्यवरांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे. ती परंपरा नाशिकच्या संमेलनात मात्र खंडित होणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

३,४,५ डिसेंबरला नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीत नियोजीत साहित्य संमेलन होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गीतकार जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचा समारोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ साहित्यिक माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

विरोध कशामुळे?

इतर भाषांशी संबंध जोपासणे हे महामंडळाच्या घटनेत नमूद एक कर्तव्य असताना व त्या कर्तव्य पालनाची महामंडळाची जाज्वल्य परंपरा असतानाही तिला मुरड घालत संमेलनाच्या उद्घाटकासाठी बऱ्याच दिवसांपासून चाललेली शोध मोहीम वादग्रस्त विश्वास पाटलांवरच येऊन का थांबली, असा प्रश्न साहित्य क्षेत्रातून विचारला जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT