भाचीने मामीचे 'ते' गुपित उघड पाडले, पुतण्याचं प्रेम टिकवण्यासाठी नेमकं काय केलं?

Crime News : महिलेने तिच्या पुतण्याशी सल्लामसलत करून पतीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला कुटुंबाला हत्येचं हे प्रकरण समजलंच नाही, त्यांनी नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नातेसंबंधांना काळिमा फारसणारी धक्कादायक घटना

point

महिलेने पुतण्याला हाताशी धरून पतीची केली हत्या

Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात नातेसंबंधांना काळिमा फारसणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेने तिच्या पुतण्याशी सल्लामसलत करून पतीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. सुरुवातीला कुटुंबाला हत्येचं हे प्रकरण समजलंच नाही, त्यांनी नैसर्गिक मृत्यू झाल्याचं सांगितलं. परंतु नंतर मृत तनू (वय 12) ही हत्येची प्रत्यक्षदर्शी होती, तिच्यामुळेच हे प्रकरण उलगडलं होतं. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

हे ही वाचा : पूजा गायकवाड नर्तिका तुरुंगात, तरीही फॉलोअर्समध्ये झाली तब्बल 'एवढी' वाढ, लाईक्सचा पडतोय पाऊस

नेमकं काय झालं? 

या प्रकरणात मृत ओमपालचा भाऊ रवी करणने पोलिसांत एफआरआय दाखल केली होती. रवी करणच्या म्हणण्यांनुसार, त्याचा भाऊ ओमपालचा विवाह प्रीती नावाच्या तरुणीशी झाला होता. लग्नानंतर ओमपाल आणि प्रीतीमध्ये भांडण सुरू झाल्याचा दावा केला होता. ओमपालने आरोप केला की, प्रीतीचे पुतण्या अभयशी अवैध संबंध होते. ज्यावेळी ओमपालला विरोध केला असता, तेव्हा प्रीतीनेही विरोध दर्शवला. रवीच्या म्हणण्यांनुसार, मी अभयला प्रीतीसोबत भेटल्याचं पाहिलं होतं. 

संबंधित प्रकरणात रवीने सांगितलं की, 8 सप्टेंबर रात्री ओमपालचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. सुरुवातीला कुटुंबियांनी ओमपालचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचे मान्य केलं. परंतु नंतर मृताच्या 12 वर्षांच्या भाचीने सांगितलेल्या एकूण घटनेनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबानंतर खूनाचा उलगडा केला आहे.

मी आणि प्रीती काकींच्या घरी झोपलो होतो तेव्हा...

माझी मुलगी नेहमी ओमपाल आणि तिच्या काकाच्या घरी खेळायला जायची आणि तिथेच झोपायची. 8 सप्टेंबरच्या संध्याकाळी ती ओमपालच्या घरी खेळायला गेली आणि तिथेच झोपली. दरम्यान, तनू ही दोन दिवसांपासून भयभीत झाली होती. मी आणि माझी पत्नी सुधाने तनूला भीतीविषयी विचारलं होतं. तिने सांगितलं की, मी आणि प्रीती काकींच्या घरी झोपलो होतो तेव्हा रात्री डोळे उघडले तेव्हा मला दिसले की प्रीची काकी माझा हात धरून होती आणि अभय हा एका कापडाने काकांचा गळा दाबत होते. हे पाहून मी भयभीत झालो होतो आणि भीतीपोटी मी हे कोणालाही सांगितलेलं नाही.

हे ही वाचा : 'सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू केल्याने...' तरुणाची सुसाईड नोट अन् खदखद व्यक्त करत नदीत घेतली उडी

संबंधित अधीक्षक शंकर प्रसाद म्हणाले, एका महिलेनं तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली आहे. दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आणि चौकशी करण्यात आली. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. दोघांनी दिलेल्या माहितीवरून, घटनास्थळावरून एक कापड जप्त करण्यात आला आहे, त्या कापडाने पतीचा गळा दाबून हत्या करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात बीबीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp