Maharashtra Weather: कोकणात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, कसं असेल वातावरण?
Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय हवामान विभागाचा अंदाज
13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा कसा असेल अंदाज?
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. मराठवाडा आणि कोकण भागात वेगवान वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता अधिक असण्याची अपेक्षा वर्तवली आहे.
कोकण विभाग:
कोकण भागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि वीज कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. कोकणातील रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच भागात वाऱ्याचा वेग 30-40 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : मूल होत नाही म्हणून महिला मांत्रिकाकडे गेली, नंतर पेढा देत अंगारही लावला, तीन लाखांना गंडा घालत... नऊ महिने सुरू होता खेळ
मध्य महाराष्ट्र:
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस वीज आणि वेगवान वाऱ्यांसह असण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरातही हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुणे शहरात वीज कडकडाटासह वादळी वाऱ्याचा वेग हा 30-40 किमी प्रतितास अपेक्षित असणार आहे.
